• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india finish after 41 years of long wait in hockey wins bronze in olympics 2020 scsg

पदक कांस्य पण क्षण सुवर्ण… विजयाचा उन्माद न करता भारतीय खेळाडूंनी जर्मन खेळाडूंना दिला धीर; पाहा खास फोटो

अत्यंत रोमहर्षक सामन्यानंतर मैदानात एकाकीकडे आनंद तर दुसरीकडे निराशा असं चित्र पहायला मिळालं

August 5, 2021 09:58 IST
Follow Us
  • India Finish After 41 Years Of Long Wait In Hockey Wins Bronze in Olympics 2020
    1/16

    उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केलाय.

  • 2/16

    भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं अन् मैदानामध्ये एकाच वेळी आनंद आणि निराशा असं चित्र पहायला मिळालं.

  • 3/16

    आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.

  • 4/16

    अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने अगदी शेवटच्या सेकंदाला विजयावर शिक्कामोर्तब केलं.

  • 5/16

    सामना जिंकल्यानंतर भारताच्या सर्वच खेळाडूंनी एकमेकांना अगदी कडकडून मिठ्या मारल्या.

  • 6/16

    अगदी सपोर्टींग स्टाफचीही अनेकांनी अगदी कडकडून मिठी मारत भेट घेतली.

  • 7/16

    भारताच्या अनेक खेळाडूंना अश्रू अनावर झाल्याचं चित्र पहायाला मिळालं.

  • 8/16

    १-३ ने मागे असणाऱ्या भारतीय संघाने दमदार कमबॅक करत ५-४ ने सामना जिंकला.

  • 9/16

    सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणाऱ्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामनाबरोबरीत सोडवणं आवश्यक होतं.

  • 10/16

    याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.

  • 11/16

    अनेक खेळाडूंनी सामना जिंकल्याचं समजल्यानंतर पेनल्टी यशस्वीपणे अढवणाऱ्या श्रीजेशला मिठ्या मारत आनंद साजरा केला.

  • 12/16

    संघातील जवळजवळ सर्वच खेळाडूंनी श्रीजेशला मिठी मारत त्याने शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवल्याबद्दल आनंमद व्यक्त केला.

  • 13/16

    भारताने दमदार खेळ करत आणि अगदी शेवटच्या क्षमापर्यंत धीर न सोडता इतिहास घडवला.

  • 14/16

    मात्र भारतीय संघाने जिंकल्याचा उन्माद न करता भारतीय खेळाडूंनी जर्मन खेळाडूंना धीर दिल्याचंही पहायला मिळालं.

  • 15/16

    एकीकडे भारतीय खेळाडू आनंद साजरा करत असतानाच दुसरीकडे जर्मन खेळाडू मात्र निराश होऊन डोकं धरुन बसल्याचं पहायला मिळालं. मात्र भारतीय खेळाडूंनी त्यांना धीर दिला.

  • 16/16

    मैदानातच सेल्फी काढण्यासही सुरुवात झाल्याचं पहायला मिळालं. (सर्व फोटो : ट्विटर आणि सोनी लिव्हवरुन साभार)

Web Title: India finish after 41 years of long wait in hockey wins bronze in olympics 2020 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.