• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2021 2nd phase bio bubble rules scsg

२५ हजारांहून अधिक चाचण्या, १०० जणांचं वैद्यकीय पथक अन् तरी करोना संसर्ग झाल्यास…; IPL साठीची तयारी पाहून थक्क व्हाल

भारतीय क्रिकेट बोर्डाने सलग दुसऱ्या वर्षी युएईमधील व्हीपीएस हेल्थकेअर या कंपनीसोबत करार केला असून.

September 16, 2021 18:46 IST
Follow Us
  • IPL 2021 2nd Phase Bio Bubble Rules
    1/35

    संयुक्त अरब अमिरातीमध्ये रविवारपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 

  • 2/35

    देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला आणि चार मे रोजी स्पर्धेतील अनेक सामने शिल्लक असतानाच स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेली.

  • 3/35

    स्पर्धेतील २९ सामने झाले असून उर्वरित ३१ सामने आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जाणार आहेत. 

  • 4/35

    दुसऱ्या पर्वामध्ये एकूण ३१ सामने होणार असून या पर्वामध्ये करोनासंदर्भातील कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने विशेष तयारी केली आहे.

  • 5/35

    भारतीय क्रिकेट बोर्डाने सलग दुसऱ्या वर्षी युएईमधील व्हीपीएस हेल्थकेअर या कंपनीसोबत करार केला असून. ही कंपनी संपूर्ण मालिकेदरम्यान रुग्णवाहिका, आप्तकालीन आरोग्य सुविधा पुरवणे आणि करोना चाचण्या करण्याबरोबरच आरोग्याशीसंबंधित सर्व सुविधा खेळाडूंना पुरवणार आहे. 

  • 6/35

    दुसऱ्या पर्वातील ३१ सामन्यांदरम्यान बायो-बबल अधिक मजबूत असावं म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे.

  • 7/35

    सर्व आठ संघांमधील खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्टींग स्टाफची दुबई आणि आबू धाबीमधील १४ वेगवेगळ्या हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय. युएईमध्ये पोहचण्याआधी ज्या हॉटेलमध्ये हे खेळाडू थांबणार आहेत तेथील सर्व कर्मचाऱ्यांच्याही करोना चाचण्या करण्यात आल्यात.

  • 8/35

    खेळाडू राहणार असणाऱ्या हॉटेलमध्ये सेवा देणारे कर्मचारी आधीपासूनच बायो-बबलमध्ये आहेत. या कर्मचाऱ्यांनाही हॉटेल बाहेर जाण्याची परवानगी नाहीय.

  • 9/35

    बायो-बललची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना खेळाडू राहत असलेल्या हॉटेल्समध्ये राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलीय.

  • 10/35

    आयपीएलसाठी एकूण १४ बायो सिक्युअर बबल बनवण्यात आले आहेत. यामध्ये आठ संघ राहणार आहेत. 

  • यो-बबल म्हणजे काय? > जगभरातील क्रीडा विश्वाने करोनाचा फैलाव झाल्यानंतर बराच काळ परिस्थिती पूर्ववत होण्याची वाट पाहिली मात्र त्यानंतरही परिस्थिती फारशी सुधारली नाही. अखेर बायो-बबल्सच्या माध्यमातून करोना काळामध्ये खेळ अधिक सुरक्षित करत क्रीडा जगताने चाहत्याचं मनोरंजन या संकटाच्या काळातही होत राहील याची काळजी घेतली.
  • 11/35

    बायो-बबल्स ही एक संकल्पना असून यामध्ये सॅनिटाइज करण्यात आलेल्या एखाद्या ठराविक परिसरामध्ये किंवा ठिकाणावर ठरवून दिलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे बायो-बबल्समध्ये प्रवेश देण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक असतं.

  • 12/35

    संघासोबतच ३ सामना अधिकारी, इतर ब्रॉडकास्टर्स आणि समालोकांनाही करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष सोय करण्यात आलीय.

  • 13/35

    सध्या दुबईमध्ये असणारे सर्वच खेळाडू क्वारंटाइन पिरिएड संपवून सरावाला लागले आहेत.

  • 14/35

    भारतामधून रवाना होतानाही खेळाडूंसाठी विशेष सोय करण्यात आलेली.

  • 15/35

    अनेक संघांनी विशेष विमानांनी आपल्या खेळाडूंना युएईमध्ये नेलं.

  • 16/35

    हॉटेल्समध्ये खेळाडूंची तपासणी आणि चाचण्या केल्या जात आहेत.

  • 17/35

    इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणारे अनेक खेळाडू आपल्या संघांसोबत जॉइन झाले आहेत.

  • 18/35

    बीसीसीआयने करोनासंदर्भातील नियमावली तयार केली असून त्याचं पान बंधनकारक आहे.

  • 19/35

    खेळाडूही स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच सर्व नियमांचं पालन करताना दिसत आहेत.

  • 20/35

    २०२० च्या आयपीएलमध्येही अशाप्रकारचे नियम लागू करण्यात आलेले.

  • 21/35

    त्या वेळेस अनेक संघांनी आपल्या खेळाडूंचे फोटो ट्विटरवरुन शेअर करत आम्ही नियमांचे पालन करतो तुम्हीही करा असं आवाहनही चाहत्यांना केल्याचं पहायला मिळालेलं.

  • दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार व्हीपीएस हेल्थकेअरने करोना व्यवस्थापनासाठी आपली एक १०० सदस्यांची टीम बनवली आहे. हे टीम खेळाडूंना आरोग्यासंदर्भातील तक्रारींमध्ये मदत करणार आहे.
  • 22/35

    दुबई, शारजा आणि आबु धाबीमध्ये सामने खेळवले जाणार असल्याने प्रत्येक मैदानासाठी वेगळी मेडिकल टीम तयार ठेवण्यात आलीय.

  • 23/35

    प्रत्येक मेडिकल टीममध्ये डॉक्टर, नर्ससोबतच टेक्निशियनचाही समावेश असून आश्यकता वाटेल तेव्हा करोना चाचणीसाठी सॅम्पल गोळा करण्याची सुविधाही मैदानांमध्येच उपलब्ध करुन देण्यात आलीय.

  • 24/35

    याशिवाय एअर अॅम्ब्युलन्स, स्पेशलिटी टेली कंन्सल्टेशन आणि सोप्र्ट्स मेडिसीन सपोर्टसारख्या सोयीसुद्धा देण्यात आल्यात. 

  • 25/35

    नवीन प्रोटोकॉलनुसार सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांना दर तिसऱ्या दिवशी करोना चाचणी करुन घ्यावी लागणार आहे.

  • 26/35

    या संपूर्ण स्पर्धेदरम्यान २५ हजारांहून अधिक करोना चाचण्या केल्या जाणार आहेत.

  • 27/35

    म्हणजेच दिवसाला २ हजारांहून अधिक चाचण्या केल्या जाणार आहेत.

  • 28/35

    यावेळी आयपीएलच्या सामन्यांसाठी क्रिकेट चाहते प्रत्यक्षात मैदानात उपस्थित राहणार आहे. मात्र ही संख्या मर्यादित असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाणार आहे.

  • 29/35

    समोर आलेल्या माहिलीनुसार मैदानातील एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रत्येक सामन्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. 

  • 30/35

    बीसीसीआयच्या आरोग्य आणि सुरक्षा नियमांनुसार एखाद्या खेळाडूला या दुसऱ्या पर्वादरम्यान करोनाचा संसर्ग झाल्यास. त्याला कमीत कमी १० दिवस क्वारंटाइन करुन आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार आहे.

  • 31/35

    संसर्ग झालेल्या खेळाडूची नवव्या आणि दहाव्या दिवशी आरटी पीसीआर चाचणी केली जाईल. मात्र या खेळाडूला पुन्हा बायो-बबलमध्ये आणि संघासोबत राहण्याची परवानगी देण्याचेही नियम तयार करण्यात आलेत. हे सर्व नियम पाळणाऱ्या खेळाडूलाच पुन्हा एकदा बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जाईल. 

  • 32/35

    संघासोबत पुन्हा जाण्यासाठी २४ तासांच्या आत खेळाडूची आरटी-पीसीआर चाचणीचे दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक असणार आहे. तसेच करोनामधून बरं झाल्यानंतर या खेळाडूमध्ये कोणतीही लक्षणं दिसता कामा नये. 

  • 33/35

    करोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात बीसीसीआयने कठोर निर्देश दिले आहेत.(सर्व फोटो-प्रातिनिधिक, फोटो सौजन्य- ट्विटर, पीटीआय)

TOPICS
आयपीएल २०२१ (IPL 2021)IPL 2021क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Ipl 2021 2nd phase bio bubble rules scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.