• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2021 kyle jamieson flirts with rcb massage therapist all you need to know about navnita gautam scsg

RCB चा स्कोअरबोर्ड ५३/४ असताना ‘तो’ मारत होता तरुणीशी गप्पा; जाणून घ्या ‘ती’ आहे तरी कोण?

या तरुणी सोबत हा खेळाडू गप्पा मारतानाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झाले असून अनेकांनी यावर मजेदार कमेंट्सही केल्यात. काहींना हा फ्लर्टींगचा प्रकार वाटलाय.

Updated: September 23, 2021 19:22 IST
Follow Us
  • IPL 2021 Kyle Jamieson flirts with RCB massage therapist all you need to know about Navnita Gautam
    1/34

    इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित पर्वामधील दुसऱ्या सामन्यात सोमवारी (२० सप्टेंबर २०२१ रोजी) कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा धुव्वा उडवला.

  • 2/34

    गोलंदाजांनी केलेल्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर कोलकाताच्या संघाने आरसीबीवर हा विराट विजय मिळवला.

  • 3/34

    पहिल्यांदा गोलंदाजी करताना फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने १३ धावा देत आरबीसीचे तीन गडी तंबूत पाठवले तर आंद्रे रसेलने ९ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करत वरुणला चांगली साथ दिली.

  • 4/34

    या कामगिरीमुळे विराटच्या संघाला तिहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

  • 5/34

    प्रभावी गोलंदाजीनंतर शुभमन गिलनं केलेल्या ४८ धावा आणि पदार्पणामध्येच व्यंकटेश अय्यरने केलेल्या नाबाद ४१ धावांच्या जोरावर केकेआरने नऊ गडी आणि ६० चेंडू राखून आरसीबीला पराभूत केलं.

  • 6/34

    विराटला कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणूनही या सामन्यात अपयश आलं.

  • 7/34

    विराटच्या संघाच्या या मानहानीकारक पराभवाची सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा रंगली.

  • 8/34

    या पराभवाच्या कारणांबद्दल एकीकडे चर्चा सुरु असतानाच अनपेक्षितपणे बंगळुरूने १५ कोटींची बोली लावत संघात स्थान दिलेल्या काइल जेमिसनचा एक फोटो सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं.

  • 9/34

    एकीकडे संघातील फलंदाज मैदानावर टीकून राहण्यासाठी धडपडत असतानाच दुसरीकडे काइल जेमिसन मात्र संघाच्या जर्सीमधील एका मुलीशी गप्पा मारताना दिसला. ही तरुणी नक्की कोण आहे ते आपण पाहूच पण त्याआधी सोशल नेटवर्किंगवरील व्हायरल पोस्ट पाहूयात…

  • 10/34

    यांचा वेगळाच सामना सुरुय अशा कॅप्शनसहीत एकाने हा फोटो शेअर केलाय.

  • 11/34

    हा १५ कोटी खर्च करुन मिळालेला निकाल असं एकाने म्हटलंय.

  • 12/34

    एकाने तर थेट मुलगी पटवत असल्याचं म्हटलंय.

  • 13/34

    एकाने मेन विल बी मेन अशी कॅप्शन या फोटोला दिलीय.

  • 14/34

    काहींनी मात्र या खेळाडूची बाजू घेत तो केवळ गप्पा मारत असल्याचं म्हटलंय.

  • 15/34

    मात्र ट्रोल करणाऱ्यांची संख्या ही बाजू घेणाऱ्यांपेक्षा अधिक असून अशाच एकाने हा तर सामन्यादरम्यानचा सामना असं म्हटलंय.

  • 16/34

    हा तर आग लगे बस्ती मे प्रकार झाला असं एकाचं म्हणणं आहे.

  • 17/34

    तो मैदानात आणि मैदानाबाहेर ही खेळू शकतो असा टोला एकाने लगावलाय.

  • 18/34

    काइल जेमिसन हा स्वत: या सामन्यात चार धावांवर बाद झाल्याचंही अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन निदर्शनास आणून दिलंय. फलंदाजीला जाण्याआधी तो या तरुणीशी गप्पा मारत होता.

  • 19/34

    आता ही तरुणी नक्की आहे तरी कोण याबद्दल बोलायचं झालं तर ती आरसीबीची मसाज थेरिपिस्ट आहे. या तरुणीचं नाव आहे नविना गौतम.

  • 20/34

    नविनाच्या इन्स्टाग्राम बायोनुसार ती कोणत्याही आयपीएल संघसाठी काम करणारी पहिलीच महिला सपोर्टींग स्टाफ असल्याचे म्हटले आहे.

  • 21/34

    नविनाचे हे आरसीबीबरोबरचे पहिलेच दुसरे वर्ष असून २०१९ साली ऑक्टोबर महिन्यात आरसीबीने तिच्यासोबत करार केला आहे.

  • 22/34

    नविनासोबतच्या कराराचे वृत्त समोर आल्यानंतर नविनाच्या नावाची प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

  • 23/34

    आयपीएलमध्ये या पूर्वी कधीही महिला सपोर्टींग स्टाफला संधी देण्यात आलेली नसल्याने नविनासोबत आरसीबीने केलेल्या करारानंतर ती अचानक प्रकाशझोतात आली.

  • 24/34

    नविनाने आरबीसीसोबत करार करण्याआधीही दोन महिलांची सपोर्टींग स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांना नंतर संधी देण्यात आली नाही.

  • नविना आधी डेक्कन चार्जर्सने अ‍ॅश्ली जॉइस आणि पेट्रीका जेकीन्स या दोघींना मसाज थेरिपिस्ट म्हणून नियुक्त केलं होतं.
  • 25/34

    नविनासाठी हा आयपीएलचा यंदाचा दुसरा हंगाम आहे.

  • 26/34

    मागील दोन वर्षांपासून ती आरसीबीसोबत आहे.

  • 27/34

    नविनाने यापूर्वी क्रिकेटपटू आणि इतर खेळाडूंबरोबर काम केलेलं आहे.

  • 28/34

    मूळची कॅनडाची असणाऱ्या नविनाने यापूर्वी ग्लोबल टी-२० कॅनडा लीगमधील टोरांटो नॅशनल्स या संघासाठी काम केलं आहे.

  • 29/34

    त्याशिवाय बास्केटबॉल आशिया कपमध्ये नविनाने भारतीय महिला संघासोबत काम केलं आहे.

  • 30/34

    नविना सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टीव्ह नाहीय.

  • 31/34

    नविनाच्या इन्स्टा अकाऊंटवर केवळ तीनच फोटो असून हा त्यापैकीच एक आहे.

  • 32/34

    नविना अनेकदा आरसीबीच्या सामन्यांदरन्यान मैदनात दिसते.

  • 33/34

    इन्स्टाग्रामवर नविनाला २४ हजारहून अधिक जण फॉलो करतात. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

TOPICS
आयपीएल २०२१ (IPL 2021)IPL 2021क्रिकेट न्यूजCricket NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2021 kyle jamieson flirts with rcb massage therapist all you need to know about navnita gautam scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.