• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketers who celebrate their birthday on december 6 adn

PHOTOS : आज एक-दोन नव्हे, तर टीम इंडियाच्या ५ क्रिकेटपटूंचा आहे ‘बर्थडे’; पाहा कोण आहेत ते

एकानं जिंकवून दिलाय वर्ल्डकप, तर दुसऱ्यानं केलाय भीमपराक्रम!

December 6, 2021 09:02 IST
Follow Us
  • ६ डिसेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवणाऱ्या पाच खेळाडूंचा आज वाढदिवस आहे. त्यापैकी पहिले नाव आहे रुद्र प्रताप सिंह म्हणजेच आरपी सिंहचे. रायबरेलीत जन्मलेला आरपी सिंह आज ३६ वर्षांचा झाला. उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात धमाकेदार शैलीत केली. २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद कसोटीत आरपीला पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात तो सामनावीर ठरला होता. २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवण्यात आरपी सिंहचा मोलाचा वाटा होता. आरपीने १४ कसोटी सामन्यात ४० बळी घेतले. त्याने ५८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६९ विकेट घेतल्या आहेत. तर १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १५ विकेट घेतल्या आहेत.
    1/5

    ६ डिसेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवणाऱ्या पाच खेळाडूंचा आज वाढदिवस आहे. त्यापैकी पहिले नाव आहे रुद्र प्रताप सिंह म्हणजेच आरपी सिंहचे. रायबरेलीत जन्मलेला आरपी सिंह आज ३६ वर्षांचा झाला. उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात धमाकेदार शैलीत केली. २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद कसोटीत आरपीला पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात तो सामनावीर ठरला होता. २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवण्यात आरपी सिंहचा मोलाचा वाटा होता. आरपीने १४ कसोटी सामन्यात ४० बळी घेतले. त्याने ५८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६९ विकेट घेतल्या आहेत. तर १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १५ विकेट घेतल्या आहेत.

  • 2/5

    टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज ३३ वर्षांचा झाला. ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रमध्ये जन्मलेल्या रवींद्र जडेजाने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जडेजाने आतापर्यंत १६८ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २७६९ धावा केल्या आहेत. जडेजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये १८८ बळी घेतले आहेत आणि ३६ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याच वेळी, जडेजाने ५७ कसोटी सामन्यात २३२ विकेट घेतल्या आहेत आणि ४८ धावांत ७ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाने २१९५ धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, ५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५६ धावा करण्यासोबतच जडेजाच्या नावावर ४६ विकेट्स आहेत.

  • 3/5

    भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आज २८ वर्षांचा झाला. ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबादमध्ये जन्मलेला बुमराह भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) खेळतो. बुमराह हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे, त्याचे सर्वात मोठे हत्यार अचूक यॉर्कर आहे, ज्याच्या मदतीने तो फलंदाजांना चकमा देण्यात पटाईत आहे. बुमराहने ५८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०८ बळी घेतले आहेत. त्याच वेळी, ५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ६६ विकेट्स घेतल्या आहेत. २४ कसोटीत बुमराहने १०१ बळी घेतले आहेत.

  • 4/5

    मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आज २७ वर्षांचा झाला. टीम इंडियाच्या टी-२० आणि वनडे सेटअपमध्ये अय्यर हा महत्त्वाचा भाग आहे. प्रथम श्रेणीतील दमदार कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कसोटी पदार्पण करण्याची संधीही मिळाली. याचा पुरेपूर फायदा घेत अय्यरने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. कानपूर कसोटीत पदार्पण करण्यापूर्वी श्रेयसने ५४ प्रथम श्रेणी सामने खेळले. यादरम्यान त्याने ४५९२ धावा केल्या. यादरम्यान त्याने त्याच्या बॅटमधून १२ शतके आणि २३ अर्धशतके झळकली. अय्यरच्या २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८१३ धावा आणि ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५८० धावा आहेत.

  • 5/5

    जोधपूरमध्ये जन्मलेला फलंदाज करुण नायर मूळचा कर्नाटकचा आहे. तो आज ३० वर्षांचा झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा करुण नायर हा वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याला फारशा संधी मिळाल्या नसल्या तरी २०१६ पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने त्रिशतक झळकावले. मात्र त्यानंतर तो केवळ तीन कसोटी सामने खेळू शकला आहे. नायरच्या नावावर सहा कसोटी सामन्यांमध्ये ६२.३३ च्या सरासरीने ३७४ धावा आहेत. याशिवाय, त्याने दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील भाग घेतला आहे, ज्यामध्ये त्याने एकूण ४६ धावा केल्या आहेत. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि ट्विटरवरून साभार)

Web Title: Indian cricketers who celebrate their birthday on december 6 adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.