• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs sa team india lands in johannesburg watch photos adn

PHOTOS : आफ्रिकेला पोहोचली विराटसेना..! उमेश यादवचा फोन पाहून लोक म्हणाले, “काय मस्त वाटतोय…”

आफ्रिकेत पोहोचलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

December 17, 2021 11:17 IST
Follow Us
  • दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या भक्कम इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे.
    1/12

    दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या भक्कम इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे.

  • 2/12

    टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड

  • 3/12

    दोन्ही संघ सेंच्युरियन, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे तीन कसोटी सामने खेळणार आहेत. सुपरस्पोर्ट पार्कमध्ये तयारी सुरू करण्यापूर्वी १८ खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये काही दिवस क्वारंटाइन केले जाईल.

  • 4/12

    भारतीय कसोटी संघ गुरुवारी (१६ डिसेंबर) सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आणि काल संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे.

  • 5/12

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यापूर्वी संघाच्या प्रस्थानाचे फोटो शेअर केले होते आणि आता बीसीसीआयच्या सोशल मीडिया हँडलवरून संघाच्या आगमनाचे फोटोही शेअर करण्यात आली आहेत.

  • 6/12

    भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.

  • 7/12

    विराट कोहली कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेत १८ जणांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताला त्यांचा नवनियुक्त उपकर्णधार रोहित शर्माची उणीव भासेल, जो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

  • 8/12

    दरम्यान, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोन प्रमुख डावखुऱ्या फिरकीपटूंशिवाय भारत कसोटी मालिकेत जाणार आहे. शुबमन गिलही दुखापतग्रस्त असून तो संघाचा भाग नाही.

  • 9/12

    आफ्रिकेत पोहोचल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या फोटोंवर विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. सर्वजण फोनमध्ये घुसलेत, उमेश यादवचा फोल्डेबल फोन काय मस्त वाटतोय, अशा प्रतिक्रिया या फोटोंवर देण्यात आल्या आहेत.

  • 10/12

    या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहली म्हणाला, ”दक्षिण आफ्रिका शेवटचे स्थान आहे, जिथे आम्ही मालिका अद्याप जिंकलेलो नाही.” भारताने दक्षिण आफ्रिकेत २० कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघ फक्त तीन सामने जिंकू शकला आहे.

  • 11/12

    २०१८ च्या शेवटच्या दौऱ्यावर त्यांनी खडतर आव्हान दिले होते, तरीही भारताने १-२ अशा फरकाने मालिका गमावली.

  • 12/12

    कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ तीन संघ (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका) दक्षिण आफ्रिकेला त्याच्या भूमीवर पराभूत करू शकले आहेत. (सर्व फोटो बीसीसीआय/ट्विटरवरून साभार)

Web Title: Ind vs sa team india lands in johannesburg watch photos adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.