• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. top five cricket and personal life controversy of virat kohli adn

PHOTOS : विराटच्या आयुष्यातील ५ ‘असे’ प्रसंग, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद; एकदा तर अनुष्कासाठी तो…

आपल्या शानदार कारकिर्दीत विराट अनेकदा वादात सापडला आहे. नुकतेच त्याचे आणि BCCIमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

December 18, 2021 11:54 IST
Follow Us
  • दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे दावे खोडून काढत विराट कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत भारतीय कसोटी कर्णधार कोहलीने गांगुलीचा दावा खोडून काढला होता. त्यामुळे कोहली आणि बीसीसीआयमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विराटचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या शानदार कारकिर्दीत तो अनेकदा वादात सापडला आहे. जाणून घेऊया विराटसोबतचे पाच मोठे वाद…
    1/6

    दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे दावे खोडून काढत विराट कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत भारतीय कसोटी कर्णधार कोहलीने गांगुलीचा दावा खोडून काढला होता. त्यामुळे कोहली आणि बीसीसीआयमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विराटचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या शानदार कारकिर्दीत तो अनेकदा वादात सापडला आहे. जाणून घेऊया विराटसोबतचे पाच मोठे वाद…

  • 2/6

    १.आयपीएलच्या सहाव्या हंगामात विराट कोहलीचा आरसीबी आणि गौतम गंभीरचा केकेआर यांच्यात सामना रंगला होता. बाद झाल्यानंतर विराट पॅव्हेलियनमध्ये परतत असताना गंभीर काही बोलला आणि त्यावर विराटला राग आला. दोघांमध्ये वादावादी सुरू झाली आणि शिवीगाळही करण्यात आली होती.

  • 3/6

    २.अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील मतभेद स्पष्ट आहेत. २०१६ मध्ये अनिल कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक बनला, मात्र तो या पदावर जास्त काळ टिकला नाही. विराट कोहलीला त्याची शिस्त आवडली नसावी. कुंबळेने वर्षभरातच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

  • 4/6

    ३.२०१२ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन भारतीय खेळाडूंना शिव्या देत होते. यावर विराट कोहलीने त्यांच्याकडे चुकीचे हावभाव केले, त्यामुळे त्याला मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला.

  • 5/6

    ४.२०१५मध्ये आयपीएल दरम्यान दिल्ली डेअरडेविल्स विरुद्धचा सामना सुरू असताना विराट कोहली बॉक्समध्ये अनुष्का शर्माशी बोलताना दिसला होता. नियमानुसार सामना सुरू असताना खेळाडू फक्त सहकारी प्रशिक्षक किंवा कर्मचारी यांच्याशीच बोलू शकतो. यासाठी कोहलीला इशाराही देण्यात आला होता.

  • 6/6

    ५.२०१५मध्ये टीम इंडिया पर्थमध्ये सराव करत होती. तेथे पत्रकार पोहोचले. त्यांना पाहताच कोहलीचा पारा चढला. खरे तर वर्तमानपत्रात विराटच्या आणि अनुष्काबद्दल लिहिलेल्या लेखामुळे तो संतापला होता.

TOPICS
बीसीसीआयBCCI

Web Title: Top five cricket and personal life controversy of virat kohli adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.