• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. national level swimmer gopal prasad yadav selling tea in patna adn

PHOTOS : ‘‘लाज तर सरकारला वाटली पाहिजे”, चॅम्पियन खेळाडूचं दुर्देव तर बघा; पदकांचा केलाय ‘असा’ वापर!

‘‘चहा विकणारे पंतप्रधान झाले, आता माझं नशीब नक्कीच बदलेल, अशी आशा होती. पण…”

December 22, 2021 12:33 IST
Follow Us
  • बिहारमध्ये खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची चर्चा सतत होत असली तरी वास्तव थक्क करणारे आहे. राष्ट्रीय स्तरावर जलतरणात अनेक पदके पटकावणारे जलतरणपटू गोपाल प्रसाद यांना पाटण्याच्या फुटपाथवर चहा विकावा लागत आहे. त्यांनी आपल्या चहाच्या स्टॉलला नॅशनल स्विमिंग टी स्टॉल असे नाव दिले आहे, जो पाटणा येथील नयाटोला येथे आहे.
    1/5

    बिहारमध्ये खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची चर्चा सतत होत असली तरी वास्तव थक्क करणारे आहे. राष्ट्रीय स्तरावर जलतरणात अनेक पदके पटकावणारे जलतरणपटू गोपाल प्रसाद यांना पाटण्याच्या फुटपाथवर चहा विकावा लागत आहे. त्यांनी आपल्या चहाच्या स्टॉलला नॅशनल स्विमिंग टी स्टॉल असे नाव दिले आहे, जो पाटणा येथील नयाटोला येथे आहे.

  • 2/5

    हे छोटे दुकान बिहारमधील खेळाडूंच्या दुर्दशेची संपूर्ण कहाणी सांगते. गोपाल प्रसाद यांनी आपल्या दुकानात अनेक पदके सजवली आहेत, रस्त्याच्या कडेला चहा बनवून विकत आहेत. १९८७ मध्ये, त्यांनी आपल्या खेळाला गती देण्यास सुरुवात केली आणि आपल्या प्रतिभेमुळे अनेक पदके जिंकली.

  • 3/5

    त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ५ पदके जिंकली आहेत. १९८८ आणि १९८९ मध्ये ते चॅम्पियन ठरले होते, पण केंद्र किंवा बिहार सरकारने त्यांची दखल घेतली नाही. खूप अडचणीनंतर आज ते चहाचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

  • 4/5

    गोपाल प्रसाद आपल्या परिस्थितीवर म्हणाले, “मला काहीच लाज वाटत नाही… लाज तर सरकारला वाटली पाहिजे. लालूंचे सरकार असो की नितीशकुमारांचे, मी सर्वत्र आवाहन केले आहे. तेथून आश्वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही.”

  • 5/5

    गोपाल प्रसाद त्यांच्या दुकानात ६ रुपये प्रति कप दराने चहा विकतात. ते म्हणाले, ”केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आले तेव्हा चहा विकणारे पंतप्रधान झाले, आता माझे नशीब नक्कीच बदलेल, अशी आशा होती. पण असे काही घडले नाही.”

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPस्विमिंगSwimming

Web Title: National level swimmer gopal prasad yadav selling tea in patna adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.