• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricket year ender 2021 virat kohlis 1 run costs 97 thousand rs cheteshwar pujaras in lakhs rohit sharma is most economical scsg

कोहलीची एक धाव पडली ९६ हजारांना, पुजारी प्रत्येक धाव ‘लाख’मोलाची; रोहित सर्वात स्वस्त, त्याची एक धाव…

बीसीसीआयने अव्वल क्रिकेटपटूंना यंदाच्या वर्षी किती पैसा दिला आणि त्या मोबदल्यात त्यांनी किती धावा केल्याचा घेतलेला आढावा

December 27, 2021 16:07 IST
Follow Us
  • cricket year ender 2021 virat kohlis 1 run costs 97 thousand rs cheteshwar pujaras in lakhs rohit sharma is most economical
    1/49

    २०२१ लवकरच निरोप घेणार आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही.

  • 2/49

    भारतीय संघाला यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीचे दोन चषक जिंकण्याच्या संधीचं सोनं करता आलं नाही.

  • 3/49

    आधी भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडकडून पराभूत होऊन कसोटीमधील हे पहिलं जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंग केलं.

  • 4/49

    त्यानंतर टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघ सुपर-१२ च्या फेरीमध्येच स्पर्धेबाहेर पडला.

  • 5/49

    याचा परिणाम म्हणून विराट कोहलीकडून एकदिवसीय क्रिकेटचं कर्णधार पद काढून घेण्यात आलं तर टी-२० चं कर्णधार पद त्याने स्वत: सोडलं.

  • 6/49

    सध्या रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.

  • 7/49

    कोहलीकडे कसोटीचं कर्णधार पद कायम आहे.

  • 8/49

    २०२१ मधील खेळाडूंच्या वैयक्तिक प्रदर्शनावर नजर टाकल्यास कोहलीला यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही.

  • 9/49

    यासाठी आता त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये केवळ एक संधी उरलीय.

  • 10/49

    विराटने यंदा ११ कसोटी, तीन एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले आहेत.

  • 11/49

    बीसीसीआयकडून प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख तर टी-२० साठी तीन लाख रुपये मानधन देण्यात येतं.

  • 12/49

    म्हणजेच कोहलीला बीसीसीआयकडून यंदा २ कोटी १३ लाख रुपये मानधन खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मिळालं.

  • 13/49

    तसेच त्याला बोर्डासोबतच्या ए प्लस श्रेणीमधील करारानुसार वर्षाचे सात कोटी रुपये देण्यात आले.

  • 14/49

    म्हणजेच विराटला यंदा बीसीसीआयकडून ९ कोटी १३ लाख रुपये मिळाले.

  • 15/49

    विराटने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात १० अर्धशतकांच्या मदतीने एकूण ९४६ धावा केल्या.

  • 16/49

    यंदा त्याचा फॉर्म फारचा चांगला राहिला नाही. अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये त्याला भोपळाही फोडता आला नाही.

  • 17/49

    केलेल्या धावा आणि मानधन याचं गणित केल्यास विराटची एक धाव ही ९६ हजार ५१२ रुपयांची ठरली.

  • 18/49

    हे सर्व आकडे २६ डिसेंबरपर्यंतचे आहेत.

  • 19/49

    याच हिशोबाने चेतेश्वर पुजाराबद्दल बोलायचं झालं तर तो फक्त कसोटी सामने खेळतो. या वर्षी त्याने सर्वाधिक म्हणजेच १४ कसोटी सामने खेळलेत.

  • 20/49

    कसोटी सामन्यांसाठी पुजाराला बीसीसीआयकडून २ कोटी १० लाख रुपये देण्यात आलेत.

  • 21/49

    बोर्डासोबतच्या कराराप्रमाणे पुजारा हा ए लिस्टेट क्रिकेटपटूंच्या यादीत असल्याने त्याला एका वर्षात बोर्डाकडून पाच कोटी रुपये दिले जातात.

  • 22/49

    म्हणजेच पुजाराला २०२१ मध्ये एकूण सात कोटी १० लाख रुपये देण्यात आले आहेत.

  • 23/49

    बॅटिंगबद्दल बोलायचं झाल्यास पुजारा यंदाच्या वर्षी काही सामने वगळले तर आऊट ऑफ फॉर्मच होता.

  • 24/49

    पुजारा यंदाच्या वर्षी त्याच्या सामान्य शैलीमध्ये आणि मैदानात स्थिरावलेला फारच कमी वेळ पहायला मिळाला.

  • 25/49

    सहा अर्धशतकांच्या मदतीने पुजाराने यंदाच्या वर्षी एकूण ६८६ धावा केल्यात.

  • 26/49

    म्हणजेच पुजाराची एक धाव एक लाख तीन हजार ४९९ रुपयांची ठरली आहे.

  • 27/49

    के. एल. राहुलने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये आपला फॉर्म कायम ठेवत दमदार सुरुवात केलीय. त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी १२२ धावा केल्या.

  • 28/49

    राहुलने यंदाच्या वर्षी पाच कसोटी, तीन एकदिवसीय सामने आणि ११ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत.

  • 29/49

    या हिशोबाने त्याने सामन्यांचं मानधन म्हणून १ कोटी २६ लाख रुपये देण्यात आले आहेत.

  • 30/49

    राहुल सुद्धा एक लिस्टेट क्रिकेटपटू असल्याने त्याला वर्षाकाठी करारानुसार पाच कोटी रुपये देण्यात येतात.

  • 31/49

    राहुलला यंदा बीसीसीआयने सहा कोटी २६ लाख रुपये दिलेत.

  • 32/49

    राहुलने यंदाच्या वर्षात तीन शतकं आणि सहा अर्धशतकांच्या जोरावर एकूण ९०३ धावा केल्यात.

  • 33/49

    म्हणजेच राहुलची एक धाव ६९ हजार ३२४ रुपयांची ठरलीय.

  • 34/49

    भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतबद्दल बोलायचं झाल्यास तो सुद्धा ए लिस्टेट खेळाडू आहे.

  • 35/49

    त्यामुळेच त्याला पाच कोटी रुपये बीसीसीआयकडून यंदा देण्यात आलेत.

  • 36/49

    पंत यंदाच्या वर्षी १२ कसोटी, दोन एकदिवसीय सामने आणि १३ टी-२० सामने देशासाठी खेळलाय.

  • 37/49

    पंतला सामन्यांचं मानधन म्हणून बीसीसीआयकडून यंदा एकूण दोन कोटी ३१ लाख रुपये देण्यात आलेत.

  • 38/49

    म्हणजेच पंतला यंदाच्या वर्षी बीसीसीआयकडून एकूण सात कोटी ३१ लाख रुपये मिळालेत.

  • 39/49

    पंत यंदाच्या वर्षी इन आणि आऊट ऑफ फॉर्म असल्याचं पहायला मिळालं. त्याच्या कामगिरीमध्ये सातत्याचा आभाव अनेकदा दिसून आला.

  • 40/49

    असं असलं तरी यंदाच्या वर्षी पंतने एक शतक आणि सात अर्धशतकांच्या जोरावर एकूण १ हजार ७४ धावा केल्यात.

  • 41/49

    म्हणजेच पंतची एक धाव ६८ हजार ६३ रुपयांची ठरलीय.

  • 42/49

    आता सर्वात शेवटी रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं तर तो यंदा सर्व प्रकारच्या क्रिकेटचा विचार केल्यास भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलाय.

  • 43/49

    रोहित शर्माने २०२१ मध्ये दोन शतकं आणि नऊ अर्धशतकांच्या जोरावर एकूण एक हजार ४२० धावा केल्यात.

  • 44/49

    यंदाच्या वर्षी रोहित ११ कसोटी, तीन एकदिवसीय सामने आणि ११ टी-२० सामने भारतासाठी खेळला आहे.

  • 45/49

    सामन्यांचं मानधन म्हणून त्याला दोन कोटी १६ लाख रुपये बीसीसीआयकडून देण्यात आलेत.

  • विराटप्रमाणे रोहितसुद्धा एक प्लस दर्जाचा खेळाडू असल्याने वर्षाचे त्याला सात कोटी रुपये बीसीसीआयकडून देण्यात आलेले आहेत.
  • 46/49

    म्हणजेच रोहितने यंदा बीसीसीआयकडून मानधन म्हणून एकूण नऊ कोटी १६ लाखांचा निधी घेतलाय.

  • 47/49

    याचा सरळ अर्थ सांगायचा झाल्यास रोहितची एक धाव ही ६४ हजार ५०७ रुपयांची ठरलीय.

  • 48/49

    रोहितला यंदा सर्वाधिक पैसे मिळाले असले तरी त्याने सर्वाधिक धावाही केल्याने प्रतिधाव मानधानचा विचार केल्यास रोहित हा सर्वोत्तम ठरलाय. (सर्व फोटो : रॉयटर्स, पीटीआय, एपी, बीसीसीआय, इंडियन एक्सप्रेस आणि सोशल नेटवरर्किंगवरुन साभार)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Cricket year ender 2021 virat kohlis 1 run costs 97 thousand rs cheteshwar pujaras in lakhs rohit sharma is most economical scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.