• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. birthday special when rahul dravid slams raina for wrong choice of clothes reviles suresh rainas book scsg

Birthday Special: …अन् द्रविडने Fu** हा आक्षेपार्ह शब्द असणारं T-shirt घालून फिरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला झापलं

मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही देशाचं प्रतिनिधित्व करताना खेळाडूंनी कसं वागलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण

January 11, 2022 09:34 IST
Follow Us
  • Birthday Special When Rahul Dravid slams Raina for wrong choice of clothes reviles Suresh Rainas Book
    1/27

    क्रिकेट हा जेंटलमन्स गेम असेल तर राहुल द्रविड तो जंटलमॅन आहे, असं म्हटलं जातं. राहुल द्रविडची क्रिकेट खेळावरील श्रद्धा आणि त्याच्या खेळाचा दर्जा अतुलनिय आहे.

  • 2/27

    सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या द्रविडचा आज वाढदिवस. केवळ मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही द्रविडने आपलं साधेपण जपल्याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात.

  • 3/27

    आपण ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतो त्याचा मान राखला पाहिजे, कितीही मोठे झालो तरी साधेपणे वागलं पाहिजे अशा अनेक गोष्टी द्रविडसंदर्भातल छोट्या मोठ्या किस्स्यांमधून अनेकदा समोर आल्यात.

  • 4/27

    असाच एक किस्सा क्रिकेटपटू सुरेश रैनाने आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगितलाय. एकदा द्रविड टी-शर्टवरुन ओरडला होता, असं या पुस्तकात म्हटलं आहे. द्रविडबद्दलचा हा किस्सा नक्की काय आहे जाणून घेऊयात त्याच्या वाढदिवसानिमित्त…

  • 5/27

    क्रिकेटचं मैदान गाजवून झाल्यानंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना आता साहित्य क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुरेश रैनाचे ‘बिलिव्ह : वॉट लाइफ अ‍ॅण्ड क्रिकेट थॉट मी’ (‘Believe: What Life and Cricket Taught Me’) हे आत्मचरित्र १४ जून २०२१ रोजी प्रकाशित झाले आहे.

  • 6/27

    यापुर्वीच रैनाने ट्विटरवरुन या पुस्तकासंदर्भातील माहिती दिली होती. त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये तो आपल्या पुस्तकावर ऑटोग्राफ देताना दिसला होता.

  • 7/27

    ‘बिलिव्ह : वॉट लाइफ अ‍ॅण्ड क्रिकेट थॉट मी’, या पुस्तकामध्ये रैनाने अनेक गोष्टींबद्दल रंजक खुलासे केलेत. धोनी, राहुल द्रविड, गांगुली यासारख्या अनेक गोष्टींवर रैनाने यापूर्वी कधीही थेटपणे न मांडलेली मतं व्यक्त केलीयत.

  • 8/27

    धोनीबरोबरच्या बाँडिंगबद्दल सुरेश रैनाने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी इतरही अनेक रंजक किस्से सुद्धा आपल्या चाहत्यांसमोर मांडलेत.

  • 9/27

    मी टीम इंडियामध्ये खेळलो, याचे कारण लोक धोनीला देतात. मात्र, धोनीच्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये इतके दिवस खेळलो असं नाही. मी फक्त माझ्या मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये खेळू शकलो, असे रैना म्हणाला.

  • 10/27

    माझ्याकडून उत्तम कामगिरी कशी करुन घ्यावी, हे धोनीला माहित होते आणि मलाही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही दोघे छोट्या शहरांमधून असल्याचा आमच्या बॉण्डींगमध्ये खूप फायदा झाला, असं रैनाने म्हटलं आहे.

  • 11/27

    जेव्हा धोनीशी असलेल्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये खेळलो, असे लोक बोलतात तेव्हा खूप त्रास होतो. टीम इंडियामध्ये माझे स्थान निर्माण करण्यासाठी मी नेहमीच परिश्रम घेतले आहेत. कठोर परिश्रमातूनच मी धोनीचा विश्वास आणि आदर जिंकला, असेही रैनाने पुस्तकात म्हटलं आहे.

  • 12/27

    भारतीय क्रिकेट आज ज्या स्थितीत आहे त्याचे श्रेय माजी कर्णधार सौरव गांगुलीला दिले जाते. असं म्हणतात की त्याने या संघाचा पाया रचला आणि त्यानेच भारतीय संघाला परदेशात जिंकण्याची सवय लावली.

  • 13/27

    मात्र २०११ च्या विश्वचषक विजयी संघात खेळलेला सुरेश रैनाने सध्याची भारतीय टीम घडवण्यासाठी गांगुलीऐवजी द्रविडची महत्वाची भूमिका असल्याचं मत व्यक्त केलंय.

  • 14/27

    जेव्हा लोक १०-१५ वर्षांमधील भारतीय संघाच्या प्रवासाबद्दल बोलतात तेव्हा त्याचे श्रेय ते धोनी आणि आधीचा कर्णधार असणाऱ्या गांगुलीला देतात. पण तिन्ही फॉर्मेटमध्ये संघ बनवण्याचे श्रेय राहुल द्रविडलाच जाते, असं रैनाने पुस्तकात म्हटलं आहे.

  • 15/27

    रैनाने राहुल द्रविड एकदा त्याला टी-शर्टवरील मजकुरावरुन ओरडल्याचा किस्साही पुस्तकामध्ये सांगितलाय.

  • 16/27

    द्रविडसारख्या वरिष्ठ खेळाडूकडून ओरडा खाल्ल्यानंतर काय झालं याबद्दलही रैनाने पुस्तकात सांगितलंय.

  • 17/27

    रैना सांगतो त्याप्रमाणे, त्याने एकदा FU*K असा मजकूर असणारं टी-शर्ट परदेश दौऱ्यावर असताना घातलं होतं. त्यावरुन राहुल द्रविडने त्याला सुनावलं होतं.

  • 18/27

    तुला समजतंय का तू घातलेल्या शर्टावर काय लिहिलं आहे? तू हे शर्ट घालून फिरतोयस. तू एक भारतीय क्रिकेटपटू आहेस हे लक्षात ठेव, अशा शब्दांमध्ये द्रविडने रैनाची कानउघाडणी केली होती.

  • 19/27

    भारतीय क्रिकेटपटू या नात्याने तू असा मजकूर असणारं शर्ट सार्वजनिक ठिकाणी घालून फिरू शकत नाहीस याच भान ठेव, अशा शब्दांमध्ये द्रविडने रैनाला सुनावलं होतं.

  • 20/27

    म्हणजेच द्रविडला असं सुचित करायचं होतं की, एका भारतीय क्रिकेटपटूने परदेशामध्ये अशापद्धतीचे आक्षेपार्ह शब्द असणारे कपडे वापरु नयेत की ज्यामुळे त्याच्या देशाचं नाव खराब होईल.

  • 21/27

    द्रविडसारख्या खेळाडूने शर्टावरील मजकुरावर आक्षेप घेतल्याने रैना पूर्णपणे गोंधळून गेला आणि त्याचवेळी तो घाबरलाही.

  • 22/27

    मी तातडीने टॉयलेटमध्ये गेलो. ते शर्ट बदललं आणि ते टी-शर्ट मी कचऱ्याच्या डब्ब्यामध्ये टाकून दिलं, असं रैनाने पुस्तकात म्हटलं आहे.

  • 23/27

    द्रविडसारख्या खेळाडूने शर्टावरील मजकुरावर आक्षेप घेणं हा आपल्यासाठी आयुष्यभराचा धडा होता असं रैना म्हणतो.

  • 24/27

    रैनाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात राहुल द्रविड संघाचा कर्णधार असतानाच केलेली.

  • 25/27

    मलेशियामध्ये झालेल्या ट्राय सिरिजमध्ये रैनाने पदार्पण केलेलं. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि भारत अशी ही ट्राय सिरीज झालेली.

  • 26/27

    अनेक रंजक गोष्टींबद्दल रैनाने आपले अनुभव मांडलेलं हे त्याचं आत्मचरित्र अनेक ऑनलाइन वेबसाईट्सवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

  • 27/27

    पण या पुस्तकामध्ये सांगतिलेला द्रविडचा किस्सा हा तो मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही देशाचं प्रतिनिधित्व करताना खेळाडूंनी कसं वागलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण घालून देणार आहे. (सर्व फोटो : सुरेश रैना ट्विटर अकाऊंट, ट्विटर, पीटीआय आणि रॉयटर्सवरुन साभार)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Birthday special when rahul dravid slams raina for wrong choice of clothes reviles suresh rainas book scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.