Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. badminton player malvika bansod create history by defeating saina nehwal pbs

Photos : महाराष्ट्राची शान! सायना नेहवालला हरवणारी नागपूरची मराठमोळी मालविका देशाची नवी आशा

बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालला दोन सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने (Malvika Bansod) इतिहास निर्माण केला.

January 13, 2022 22:21 IST
Follow Us
  • बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालला दोन सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने (Malvika Bansod) इतिहास निर्माण केला. या विजयाबरोबर बॅडमिंटनमध्ये सायना, पी.व्ही.सिंधू यांच्यानंतरही देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्याकरीता नवीन पिढी सज्ज असल्याचे मालविकाने दाखवून दिले.
    1/6

    बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालला दोन सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने (Malvika Bansod) इतिहास निर्माण केला. या विजयाबरोबर बॅडमिंटनमध्ये सायना, पी.व्ही.सिंधू यांच्यानंतरही देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्याकरीता नवीन पिढी सज्ज असल्याचे मालविकाने दाखवून दिले.

  • 2/6

    मुळची नागपूरच्या असणाऱ्या मालविका बनसोडने इंडियन ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये इतिहास घडवला आहे. २० वर्षांच्या मालविकाने सायना नेहवालला पराभूत करत बॅडमिंटन जगतामध्ये खळबळ उडवून दिली आहे.

  • 3/6

    मालविकाने सायनाला २१-१७ आणि २१-०९ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आहे. जागतिक क्रमावारीत सायना २५ व्या तर मालविका १११ व्या क्रमांकावर आहे.

  • 4/6

    मालविकाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि विश्वराज ग्रुपचे प्रमुख अरुण लखानी यांनी तिचे अभिनंदन केले. लखानी यांनी तिला २०१९ पासून मदत देखील केली आहे.

  • 5/6

    “मालविकाने मिळवलेले यश प्रचंड मोठे आहे, पण ते अनपेक्षित नक्कीच नाही. तिच्यात प्रचंड क्षमता आहे. मोठ्या स्तरावरील स्पर्धा खेळून देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करण्याची तिची क्षमता आहे. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. मालविकाचे प्रशिक्षक संजय मिश्रा आणि तिच्या आई-वडिलांच्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे,” या शब्दात लखानी यांनी मालविकाचे कौतुक केले.

  • 6/6

    मालविका ही महाराष्ट्राची एक उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार आहे. अंडर -१३ आणि अंडर -१७ या राज्यस्तरीय स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. २०१८ मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली होती. २०१८ मध्ये तिने साऊथ एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवला होता, तर २०१९ मध्ये तिने ऑल इंडिया सीनिअर रँकिंग टुर्नामेंटमध्येही विजय मिळवला होता. २०१९ मध्ये मालविकाने मालदीव्ज आंतरराष्ट्रीय फ्युचर सीरिज स्पर्धा जिंकली होती.

TOPICS
बॅडमिंटनBadmintonसायना नेहवालSaina Nehwal

Web Title: Badminton player malvika bansod create history by defeating saina nehwal pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.