• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. australia all rouder glenn maxwell set to marry his fiancee vini raman love story sgy

PHOTOS: ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होणार भारताचा जावई; लग्नाच्या पत्रिकेवर छापला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो; फिल्मी लव्हस्टोरी

तामिळ भाषेत असणारी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Updated: February 15, 2022 17:03 IST
Follow Us
  • ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार ग्लेन मॅक्सवेल लवकरच आपल्या भारतीय प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
    1/22

    ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार ग्लेन मॅक्सवेल लवकरच आपल्या भारतीय प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

  • 2/22

    ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • 3/22

    त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 4/22

    तामिळ भाषेत असणारी ही पत्रिका पाहून अनेकजण कौतुक करत आहेत.

  • 5/22

    मॅक्सवेल आणि विनी २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • 6/22

    २०२० मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.

  • 7/22

    करोनामुळे त्यांच्या लग्नाचा मुहूर्त चुकला होता.

  • 8/22

    पण आता २७ मार्चला मेलबर्नमध्ये दोघेही भारतीय पद्धतीने विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • 9/22

    मूळची भारतीय असणारी विनी ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहे.

  • 10/22

    इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार ती एक फार्मासिस्ट आहे.

  • 11/22

    विनी मुळची भारतातील चेन्नईमधील असली तरी तिचा जन्म आणि शिक्षण ऑस्ट्रेलियात झालं आहे.

  • 12/22

    तिथेच तिने फार्मसीचं शिक्षण घेतलं.

  • 13/22

    विनीचे रमनचे वडील वेंकट रमन आणि आई विजयालक्ष्मी रमन तिच्या जन्माआधीच ऑस्ट्रेलियात वास्तव्याला गेले होते.

  • 14/22

    मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न पारंपारिक तामिळ ब्राह्मण पद्धतीने होणार आहे.

  • 15/22

    या लग्नात अनेक क्रिकेटर्स तसंच आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • 16/22

    विनीची नातेवाईक नंदिनी सत्यमूर्ती यांनी केलेल्या ट्वीटनुसार, विनीच्या आई-वडिलांकडून तामिळ भाषेतील पत्रिका आपल्या संस्कृतीप्रती असलेला आदर दर्शवत आहे.

  • 17/22

    हिंदू पद्धतीने हा विवाह व्हावा यासाठी ते तयारी करत आहेत.

  • 18/22

    दरम्यान मॅक्सवेलच्या करिअरबद्दल बोलायचं गेल्यास फलंदाजीसोबत फिरकी गोलंदाज म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.

  • 19/22

    आयपीएल २०२२ लिलावाआधी या अष्टपैलू खेळाडूला आरसीबीने ११ कोटींमध्ये रिटेन केलं होतं.

  • 20/22

    लग्नामुळे मॅक्सवेल आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

  • 21/22

    या लग्नासोबत अजून एक विदेशी खेळाडू भारताचा जावई होईल.

  • 22/22

    (Photos: Social Media)

TOPICS
क्रिकेटCricketलग्नMarriage

Web Title: Australia all rouder glenn maxwell set to marry his fiancee vini raman love story sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.