• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl indian cricketers who won orange cap in indian premier league by setting up highest score history photo kak

Photo : गेंद आई, बल्ला घुमा…IPLमध्ये ऑरेंज कॅप नावावर करणारे भारताचे स्टार फलंदाज

आयपीएल हंगामात सगळ्यात जास्त धावा करणारा खेळाडू ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो.

Updated: April 4, 2022 10:57 IST
Follow Us
  • आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय.
    1/15

    आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय.

  • 2/15

    सगळ्यात जास्त धावा करणारा खेळाडू आयपीएलमधील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो.

  • 3/15

    ऑरेंज कॅप नावावर करण्यासाठी फलंदाज धुवांधार बॅटिंग करताना दिसत आहेत.

  • 4/15

    आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त धावा करून पाच भारतीय खेळाडूंनी ऑरेंज कॅपवर आपलं नाव कोरलं आहे.

  • 5/15

    सचिन तेंडुलकर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑरेंज कॅपवर नावावर करणारा पहिला भारतीय क्रिकेटर आहे.

  • 6/15

    २०१०च्या आयपीएलमध्ये १५ क्रिकेट सामन्यांत सचिनने एकूण ६१८ धावा केल्या होत्या. या हंगामात नाबाद ८९ धावांची खेळी करत सचिनने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.

  • 7/15

    रॉबिन उथप्पा : आयपीएल २०१४च्या हंगामात सगळ्यात जास्त धावा करत रॉबिन उथप्पा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.

  • 8/15

    या हंगामात उथप्पाने १६ क्रिकेट सामन्यांत एकूण ६६० धावा केल्या होत्या.

  • 9/15

    विराट कोहली : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीने देखील ऑरेंज कॅप नावावर करण्याचा विक्रम केला होता.

  • 10/15

    २०१६च्या आयपीएल हंगामात १६ क्रिकेट सामन्यांत विराटने चार शतकांसोबत ९७३ धावांची खेळी करत ऑरेंज कॅप नावावर केली होती.

  • 11/15

    के एल राहुल : आयपीएल २०२०च्या हंगामात सगळ्यात जास्त धावा करणारा के एल राहुल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.

  • 12/15

    या हंगामात राहुलने १४ क्रिकेट सामन्यांत एकूण ६७० धावा केल्या होत्या.

  • 13/15

    ऑरेंज कॅप नावावर करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला होता.

  • 14/15

    ऋतुराज गायकवाड : २०२१ च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून फलंदाजी करणाऱ्या ऋतुराजने दमदार खेळीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.

  • 15/15

    ऋतुराजने या हंगामात १६ क्रिकेट सामन्यांत एकूण ६३५ धावा करत ऑरेंज कॅप नावावर केली होती.(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Ipl indian cricketers who won orange cap in indian premier league by setting up highest score history photo kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.