• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know the cricketer who lose captaincy in ipl during season pbs

Photos : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद? IPL मधील ‘या’ खेळाडूंनाही द्यावा लागलाय राजीनामा

आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपल्या कर्णधारपदाचा हंगाम सुरू असतानाच राजीनामा द्यावा लागलाय. त्यांचा आढावा.

April 27, 2022 00:18 IST
Follow Us
  • यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी प्रचंड निराशाजनक राहिलीय. तब्बल ८ सामने हरल्यानंतर आता मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा आहे. रोहितला हंगाम सुरू असताना मध्येच कर्णधारपद सोडावा लागलं तर असं करावं लागलेला रोहित पहिला खेळाडू नसेल. याशिवाय असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना याआधी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागलाय.
    1/10

    यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी प्रचंड निराशाजनक राहिलीय. तब्बल ८ सामने हरल्यानंतर आता मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा आहे. रोहितला हंगाम सुरू असताना मध्येच कर्णधारपद सोडावा लागलं तर असं करावं लागलेला रोहित पहिला खेळाडू नसेल. याशिवाय असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना याआधी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागलाय.

  • 2/10

    १. केविन पीटरसन – २००९ मध्ये आरसीबीने केविन पीटरसनकडून कर्णधारपद काढून दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेकडे दिलं होतं.

  • 3/10

    २. कुमार संघकारा – २०१२ मध्ये डेक्कन चार्जर्सने कुमार संघकाराला कर्णधार पदावरून हटवलं होतं. तसेच कॅमरन व्हाईटला कर्णधार बनवलं.

  • 4/10

    ३. डॅनियल विटोरी – २०१२ मध्ये डॅनियल विटोरीने आरसीबीचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर विराट कोहली आरसीबीचा कर्णधार झाला.

  • 5/10

    ४. रिकी पाँटिंग – मुंबई इंडियन्सने २०१३ मध्ये हंगाम सुरू असतानाच रिकी पाँटिंगला कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे नेतृत्व दिलं होतं.

  • 6/10

    ५. एडम गिलख्रिस्ट – गिलख्रिस्टने २०१३ मध्ये आयपीएल हंगामाच्या मध्येच कर्णधारपद सोडलं. त्यानंतर डेविड हसीला कर्णधारपद देण्यात आलं.

  • 7/10

    ६. गौतम गंभीर – २०१८ मध्ये गौतम गंभीरला दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद मिळालं. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने गंभीरने हंगाम सुरू असतानाच कर्णधारपद सोडलं. यानंतर श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार झाला.

  • 8/10

    ७. अजिंक्य रहाणे – २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेच्या जागेवर स्टिव्ह स्मिथला कर्णधार केलं.

  • 9/10

    ८. दिनेश कार्तिक – २०२० मध्ये दिनेश कार्तिकने हंगामाच्या मध्येच केकेआरचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर इयोगन मॉर्गनला कर्णधारपद देण्यात आलं.

  • 10/10

    ९. डेविड वॉर्नर – २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादने डेविड वॉर्नरकडून कर्णधारपद काढून केन विलियसनला दिलं.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025रोहित शर्माRohit Sharma

Web Title: Know the cricketer who lose captaincy in ipl during season pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.