-

सचिन तेंडुलकरने नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझनमधून त्याची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. (सर्व फोटो -संग्रहीत)
-
विशेष बाब म्हणजे सचिन तेंडुलकरच्या या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही स्थान मिळालेले नाही.
-
या टीमसाठी जोस बटलर सचिनची पहिली पसंती होती. “या आयपीएलमध्ये मला त्याच्यापेक्षा जबरदस्त खेळाडू दिसत नाही. जेव्हा बटलर पुढे येतो तेव्हा बरेच जण त्याला रोखू शकत नाहीत.” असं सचिन म्हणाला आहे.
-
त्याचसोबत सचिनने दुसऱ्या क्रमांकासाठी भारताचा स्फोटक फलंदाज शिखर धवनची निवड केली आहे. सचिन धवनबद्दल म्हणाला की, “तो उत्कृष्टरित्या धावांचा वेग वाढवतो आणि स्ट्राइक रोटेट करत राहतो. डावखुरा फलंदाज नेहमीच कामी येतो आणि शिखरचा अनुभवही कामी येईल.”
-
यानंतर सचिनने लखनऊ सुपर जायंट्सच्या केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकासाठी निवडले. राहुल बटलरनंतर १५ डावांत दोन शतकं व एकूण ६१६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
हार्दिक पंड्याला सचिनने चौथ्या स्थानवर आणि त्यांचा सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार म्हणून निवडले आहे.
-
तेंडुलकरला फलंदाजांचे डावे-उजवे संयोजन सुरू ठेवायचे होते, म्हणून त्याने डेव्हिड मिलरला पाचव्या क्रमांकासाठी निवडले.
-
लिव्हिंग्स्टन मध्ये षटकार मारण्याची क्षमता आहे, तो जबरदस्त खेळाडू असल्याचे म्हणत सचिनने त्याची सहाव्या स्थानवर निवड केली.
-
सचिन तेंडुलकरने भारताचा संयमी खेळाडू दिनेश कार्तिकला यष्टिरक्षक म्हणून निवडत आपल्या संघात स्थान दिले आहे.
-
यानंतर सचिनने गोलंदाजांमध्ये आफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानला स्थान दिलं आहे.
-
याचबरोबर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा देखील समावेश केला आहे.
-
शमीच्या जोडीला सचिनने भारताचा सलामीचा आणि भेदक गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.
-
तर, युझवेंद्र चहलच्या रुपाने आणखी एका फिरकीपटूचा सचिनने त्याच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.
-
या हंगामातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारेच आपण प्लेइंग इलेव्हनची निवड केल्याचे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.
PHOTOS : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची IPL 2022 मधील ‘बेस्ट प्लेइंग इलेव्हन’ तुम्हाला माहीत आहे का?
विराट कोहली, रोहित शर्माला नाही दिलंय स्थान; जाणून घ्या कोणाला बनवलं आहे या बेस्ट टीमचं कॅप्टन
Web Title: Sachin tendulkar choose his best playing xi from ipl 2022 virat kohli rohit sharma have no place msr