-
यूएईमध्ये सध्या आशिया चषक स्पर्धेची धूम आहे. या स्पर्धेतील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत.
-
आगामी ४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
-
याआधी या दोन्ही संघांत २८ ऑगस्ट रोजी लढत झाली होती. हा सामना चांगलाच रोमहर्षक झाला होता.
-
या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता.
-
या सामन्यात भारताचे अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत विजय खेचून आणला होता.
-
येत्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लढतीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.
-
असे असताना रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या स्पर्धेच्या बाहेर पडला आहे.
-
रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू असून त्याचे संघात नसणे म्हणजे चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.
-
त्याने २८ ऑगस्ट रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली होती. हार्दिक पंड्याला साथ देत त्याने २९ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या होत्या.
-
जडेजाच्या या खेळीमुळे भारताला विजय सोपा झाला होता. ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाक सामन्यातही तो अशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
-
मात्र आता तो दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर पडल्यामुळे संघात कोणाला संधी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-
जडेजाची कमी भरून काढणाऱ्या खेळाडूला या सामन्यात संधी दिली जाऊ शकते.
‘सर’ तुम्ही हवे होता! भारतीय संघाला जाणवणार रवींद्र जडेजाची कमतरता, कारण…
यूएईमध्ये सध्या आशिया चषक स्पर्धेची धूम आहे. या स्पर्धेतील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत.
Web Title: Asia cup 2022 ravindra jadeja out ahead ind vs pak match will his absence effect on indian team prd