-
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रायली रूसोने बांग्लादेश विरुद्ध खेळताना ५६ चेंडूत १०९ धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने ९७ मीटर लांब षटकार लगावला होता.
-
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू मार्कस स्टोइनीसने श्रीलंकाविरुद्ध खेळताना १८ चेंडूत ५९ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने महेश तीक्ष्णाच्या चेंडूवर ९७ मीटर लांब षटकार लगावला होता.
-
पाकिस्तानचा फलंदाज इफ्तिखार अहमदने भारताविरुद्ध खेळताना ३४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने अक्षर पटेलच्या चेंडूवर ९७ मीटर लांब षटकार लगावला होता.
-
स्कॉटलॅंडचा खेळाडू मायकेल जोन्सने पात्रता फेरीदरम्यान जोशुआ लिटिलच्या चेंडूवर ९८ मीटर लांब षटकार लगावला होता.
-
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने न्यूजीलंड विरुद्धच्या सामन्यात ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर १०२ मीटर लांब षटकार लगावला होता.
-
वेस्टइंडीजचा खेळाडू रोवमेन पॉवेलने पात्रता फेरीदरम्यान, झिम्बाव्बे विरुद्ध झालेल्या सामन्यात १०४ मीटर लांब षटकार लगावला होता.
-
वेस्टइंडीजचा खेळाडू ओडियन स्मिथने आयरलंड विरुद्ध खेळलेल्या सामन्यात चेंडू मैदानाबाहेर पाठवत १०६ मीटर लांब षटकार लगावला होता.
-
यूएईचा खेळाडू जुनैज सिद्धीकीने श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात या विश्वचषकातला लांब षटाकार लगावला होता. हा षटकार १०९ मीटर लांब गेला होता.
-
आस्ट्रेलिया विरुद्ध न्यूजीलंड यांच्या सुपर १२ चा पहिला सामना खेळवण्यात आला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्शने ९७ मीटर लांब षटकार लगावला होता.
T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषक स्पर्धेत ‘या’ नऊ खेळाडूंनी मारले गगनचुंबी षटकार, पाहा PHOTO
टी-२० विश्वचषकात आतापर्यंत २५ पेक्षा जास्त सामने खेळून झाले आहेत. यंदाच्या विश्वचषकात सर्वात लांब षटकार मारणारे ९ खेळाडू नेमके कोण आहेत, जाणून घेऊया.
Web Title: Top 9 player who hit long six in t20 world cup 2020 spb