• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. so happy joy in saudi arabia after winning against lionel messi mighty team argentina pvp

Photos: इतनी खुशी! मेस्सीच्या बलाढ्य संघाविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर सौदी अरेबियामध्ये आनंदी आनंद!

हा विजय या सौदी अरेबियासाठी इतका मोठा होता की देशाच्या राजाने कालचा विजय साजरा करण्यासाठी देशभरामध्ये एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

Updated: November 23, 2022 11:52 IST
Follow Us
  • Saudi Arabia won against Messi's mighty team Argentina
    1/15

    फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवार २२ नोव्हेंबरला एक धक्कादायक निकाल नोंदवला गेला. विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या बलाढ्य अर्जेटिना संघाला सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला.

  • 2/15

    एक गोलच्या पिछाडीनंतरही उत्तरार्धात सालेह अलशेरी आणि सालेम अलडावसारी यांनी पाच मिनिटांच्या अंतराने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर सौदी अरेबियाने त्यांच्या फुटबॉल इतिहासातील सर्वांत मोठा विजय साकारला.

  • 3/15

    हा विजय या देशासाठी इतका मोठा होता की सौदी अरेबियाच्या राजाने कालचा विजय साजरा करण्यासाठी आज देशभरामध्ये एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

  • 4/15

    सौदी अरेबियामधील सरकारी वृत्तवाहिनीच्या हवाल्याने ‘खलिज टाइम्स’ने देलेल्या वृत्तानुसार आज सौदी अरेबियातील शेअर बाजारही बंद राहणार आहे.

  • 5/15

    सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सौदी अरेबियाला यापूर्वीच्या पाच स्पर्धामध्ये एकही सामना जिंकता आला नव्हता. मात्र कालच्या विजयानंतर या अपयशाचा डाग सौदी अरेबियाने अखेर खोडून काढला आहे.

  • 6/15

    अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीने चार विश्वचषक स्पर्धामध्ये गोल करण्याची किमया या वेळी साधली खरी, पण तो संघाला विजयी करू शकला नाही.

  • 7/15

    सामन्याच्या दहाव्याच मिनिटाला मेसीने पेनल्टीच्या साहाय्याने गोल करून अर्जेटिनाला आघाडीवर नेले होते. मध्यंतरापर्यंत अर्जेटिनाला आघाडी राखण्यात यश आले.

  • 8/15

    मात्र, उत्तरार्धात पाच मिनिटांच्या अंतराने सौदी अरेबियाने दोन गोल करून सनसनाटी निर्माण केली. सामन्याच्या ४८व्या मिनिटाला अगदी मैदानालगत किक मारून शेरीने गोलजाळीचा अचूक वेध घेतला.

  • 9/15

    बरोबरीनंतर प्रेरित झालेल्या सौदी अरेबियाच्या आक्रमणांना वेगळीच धार आली आणि ५३व्या मिनिटाला गोलकक्षाच्या रेषेवरून डावसारीने गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली.

  • 10/15

    या गोलनंतर स्टेडियमवर काही काळ शांतता पसरली. अर्जेटिनाला यानंतर पुनरागमन करता आले नाही.

  • 11/15

    सौदी अरेबिया या एकाच देशाने अशा प्रकारे पहिल्यांदाच एखादा सामना जिंकल्यानंतर सुट्टी जाहीर केलेली नाही.

  • 12/15

    यापूर्वीही कॅमेरॉननेही अशाप्रकारे विश्वचषक स्पर्धेमधील विजयानंतर सुट्टी जाहीर केली होती. कॅमेरॉननेही अर्जेंटिनाला १९९० साली पराभूत केलं होतं.

  • 13/15

    सौदीविरुद्धच्या पराभवाने अर्जेटिनाची सलग ३६ सामन्यांत अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली.

  • 14/15

    या पराभवाने १९९०च्या विश्वचषक स्पर्धेच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा मॅराडोनाच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाला कॅमेरूनकडून १-० असा पराभव पत्करावा लागला होता.

  • 15/15

    हेही वाचा : FIFA World Cup 2022: चाहत्यांना धक्का! स्टेडियममध्ये मिळणार नाही बीअर; कतार सरकारने ‘या’ गोष्टींवरही घातली बंदी

TOPICS
फिफाFIFAफिफा विश्वचषकFIFA World Cupलिओनेल मेस्सीLionel Messi

Web Title: So happy joy in saudi arabia after winning against lionel messi mighty team argentina pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.