-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चालू वर्षी पहिल्या महिला आयपीएल या स्पर्धेचा घाट घातला आहे. काही दिवसांपूर्वीच स्पर्धेचे प्रसारण हक्क तब्बल ९५१ कोटींना विकले गेले होते. त्यानंतर महिला आयपीएलच्या संघ मालकीसाठी नुकतीच बोली प्रक्रिया पार पडली. बुधवारी (२५ जानेवारी) झालेल्या या प्रक्रियेत नवे पाच संघ, त्यांच्या संगमालाक व त्यांना मिळालेल्या रकमेची घोषणा बीसीसीआयकडून केली गेली. तसेच यावेळी स्पर्धेचे नामकरणही करण्यात आले.
-
BCCI च्या महिला प्रीमियर लीगच्या पाचही संघांची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या संघांच्या लिलाव प्रक्रियेत BCCIने पाच संघांना ४,६७० कोटींना विकले. महिला प्रीमियर लीगचा सर्वात महागडा संघ १,२८९ कोटी रुपयांना विकला गेला. तर सर्वात स्वस्त संघ ७५७ कोटी रुपयांना विकला गेला. महिला प्रीमियर लीगच्या या लिलावाने IPL २००८ चा देखील विक्रमही मोडला. पाकिस्तान सुपर लीगच्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग महिला आयपीएलचा एक संघ आहे.
-
पाकिस्तान सुपर लीग रकमेच्या बाबतीत महिला प्रीमियर लीगच्या पुढे टिकाव धरूचं शकत नाही. २०१५ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे पाच संघ ९३ दशलक्ष डॉलर्समध्ये विकले. यानंतर, २०१९ मध्ये, या लीगचा सहावा संघ ६.३५ दशलक्ष डॉलर्समध्ये विकला गेला. पीएसएलच्या सर्व ६ संघांची एकूण किंमत १०० दशलक्ष डॉलर्स देखील नाही.
-
सुरुवातीला, ३३ कंपन्यांनी महिला आयपीएलमध्ये फ्रँचायझी खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले होते आणि निविदा कागदपत्रे खरेदी केली होती. मात्र, यापैकी केवळ १७ पक्षांनी तांत्रिक बोलीसाठी आपली कागदपत्रे सादर केली. यामध्ये सात आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांचा समावेश होता. यापैकी फक्त तिघांनाच महिला आयपीएल फ्रँचायझी मिळाली.
-
पुरुष आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅंचायजी असलेल्या मुंबई इंडियन्सचे मालकी हक्क असलेल्या रिलायन्स ग्रुपच्या इंडियाविन स्पोर्ट्स यांनी ९०१ कोटी रुपयांची बोली लावत मुंबई फ्रॅंचायजी आपल्याकडे ठेवली.
-
पुरुष आयपीएलमधील इतर दोन संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी ९०१ कोटी रुपयांना बेंगलोर तर, दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रुपने ८१० कोटींना दिल्ली फ्रॅंचायजी मिळवली. तर, कॅप्री ग्लोबल कॅपिटल यांनी ७५७ कोटींना लखनऊ फ्रॅंचाईजी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
-
या सर्व संघांनी एकत्रितपणे लावलेल्या या बोलींमुळे पहिल्याच वर्षी या स्पर्धेचे मूल्य ४६६९.९९ कोटी इतके झाले. पुरुष आयपीएलच्या पहिल्या वर्षी इतकी रक्कम बीसीसीआयला मिळाली नव्हती.
-
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही स्पर्धा वुमन्स प्रीमियर लीग या नावाने ओळखले जाईल असे देखील घोषित केले. ज्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, लखनौ आणि दिल्लीचा समावेश आहे.
-
”आजचा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण आज महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनसाठी लिलाव पार पडला. या लिलावाने पहिल्या पुरुष आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत”, अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली.
Women’s IPL: महिला आयपीएलचा रंगणार थरार! तब्बल ४६९९ कोटींची रक्कम खर्च करत पाकिस्तान सुपर लीगच्या बजेटला टाकले मागे
बहुप्रतिक्षित असेलल्या भारतातील पहिल्या महिला आयपीएलसाठी आज मुंबईत लिलाव पार पडला. पीएसएलच्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग महिला IPLचा एक संघ आहे.
Web Title: Womens ipl is a complete thrill as womens ipl of 5 teams spending an amount of rs 4699 crores which is much behind of psl avw