-
सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. काही दिवसांपासूनच सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला होता.
-
सचिनच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटच्या देवाच्या प्रत्येक सामन्यातील प्रत्येक गोष्ट लक्षात आहे. पण तेंडुलकर विषयी काही खास गोष्टी आज आपण पाहूया…
-
आज जगात गाजतंय असं सचिनचं नाव हे प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्यावरून ठेवण्यात आले होते. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे त्यांचे फॅन होते.
-
सचिनने शाळेत क्रिकेट खेळतानाच विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. विनोद कांबळीसह शारदाश्रम शाळेत क्रिकेट खेळताना त्याने एकाच सामन्यात नाबाद ३२५ धावा काढल्या होत्या.
-
सचिन तेंडुलकरला १४ व्या वर्षी सुनील गावस्कर यांनी आपल्या पॅडची एक जोडी गिफ्ट केली होती आणि हे गिफ्ट नंतर चोरीला गेले होते
-
मास्टर ब्लास्टरने वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
-
१९८७ च्या विश्वचषकात सचिनने बॉल बॉय म्हणून काम केले होते
-
सचिनने १९८९ ला पहिल्या टेस्ट सामन्यात पाकिस्तान विरुद्ध केवळ १५ धावा काढल्या होत्या. वकार युनीसने कराची मध्ये पहिल्यांदा सचिनची विकेट घेतली होती.
-
१९९२ पासून सचिनने ६ विश्वचषक खेळले आहेत. ९६, ९९, २००३, २००७ इतक्यांदा विश्वचषक भारताच्या हातातून निसटला होता. अखेरीस सचिनच्या शेवटच्या वर्ल्डकपला २०११ मध्ये भारताने विजय मिळवला.
-
एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनला ६२ वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे.
-
सचिन आणि २४ तारखेचा फार खास संबंध आहे. २४ फेब्रुवारी १९८८ ला सचिनने विनोद कांबळीसह हॅरिस शिल्ड सेमीफायनलमध्ये ६६४ धावांची भागीदारी केली होती.
-
१९९० मध्ये १७ व्या वर्षी सचिन आणि अंजली हे पहिल्यांदा मुंबई विमानतळावर भेटले होते. तेव्हा सचिन आपलं पहिलं शतक झळकावून मुंबईत परतला होता.
-
२२ व्या वर्षी सचिनने २४ मे १९९५ ला अंजलीशी लग्न केले होते.
-
२४ नोव्हेंबर १९८९ ला वयाच्या १६ व्या वर्षी टेस्ट करिअरमध्ये पहिल्यांदा ५० धावा पूर्ण केल्या होत्या.
-
२४ फेब्रुवारी २०१० ला सचिनने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध पहिल्यांदा वनडे मध्ये दुहेरी शतक झळकावले होते.
सचिन तेंडुलकरच्या खऱ्या फॅनलाच माहीत असतील ‘या’ १० दुर्मिळ गोष्टी; क्रिकेटच्या देवाचे किस्से वाचून व्हाल थक्क
Sachin Tendulkar Quiz: क्रिकेटचा देव आज ५० वर्षाचा झाला आहे. सचिनच्या आयुष्यातील काही सुंदर आणि काही थक्क करणाऱ्या गोष्टींची ही एक झलक पाहूया…
Web Title: Sachin tendulkar quiz rare photos of master blaster how ball boy in world cup became god of cricket happy birthday sachin svs