Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indi vs pak will face each other again on 10th september know how the second big fight can happen vbm

Asia Cup 2023: १० सप्टेंबरला पुन्हा होणार भारत-पाक सामना, जाणून घ्या कशी होऊ शकते दुसरी मोठी लढत?

Indi vs Pak will face each other again on 10th September: कौटुंबिक कारणांमुळे बुमराह मायदेशी परतला असून काळजी करण्यासारखे काही नाही, असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

September 3, 2023 21:48 IST
Follow Us
  • Indi vs Pak will face each other again on 10th September
    1/9

    शनिवारी (२ सप्टेंबर) आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक शानदार सामना खेळला गेला. ज्यामध्ये पावसाने खेळात व्यत्यय आणला आणि चाहत्यांची निराशा केली. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 2/9

    पण चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. कारण १० सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 3/9

    २ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना रद्द होताच पाकिस्तान सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. सुपर-4 साठी पात्र होण्यासाठी, भारताला स्पर्धेतील आपला पुढील सामना जिंकावा लागेल, जो ४ सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध खेळला जाईल. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 4/9

    भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेहून मुंबईत परतला आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी येथे सोमवारी (४ सप्टेंबर) होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 5/9

    कौटुंबिक कारणांमुळे बुमराह मायदेशी परतला असून काळजी करण्यासारखे काही नाही, असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 6/9

    नेपाळविरुद्ध विजयाची नोंद करून टीम इंडिया सुपर-4मध्येही पोहोचेल. भारत आणि पाकिस्तानचे संघ अ गटात आहेत. पात्रता संपल्यानंतर दोन्ही संघ अनुक्रमे ए-2 आणि ए-1 मध्ये पोहोचतील. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 7/9

    गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतरही टीम इंडिया ए-2 वरच राहील. सुपर-4 टप्प्यात, १० सप्टेंबर रोजी, ए-1 आणि ए-2 यांच्यात सामना पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 8/9

    ज्यामध्ये पाकिस्तान एक संघ म्हणून पोहोचला आहे. आता टीम इंडियाने नेपाळला पराभूत करताच १० सप्टेंबरला आणखी एका भारत-पाक सामन्याचा निर्णय होणार आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 9/9

    यानंतर फायनलमध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात टक्कर होऊ शकते. मात्र फायनलबाबत आत्ताच काही सांगता येत नसले, तरी सुपर-4मध्ये पुन्हा एकदा हे दोघे एकमेकांशी भिडणार हे जवळपास निश्चित आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pak

Web Title: Indi vs pak will face each other again on 10th september know how the second big fight can happen vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.