-

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर होता.
-
आशिया चषकाच्या निमित्ताने पुन्हा बुमराहची धडाकेबाज खेळी पाहायला मिळणार असा विचार करून चाहते आनंदी झाले होते. पण आयत्या वेळी बुमराहला श्रीलंकेतून पुन्हा मायदेशी परतावे लागले.
-
जसप्रीत बुमराह व संजना गणेशन या गोड जोडप्याने एका गोड बाळाला जन्म दिला आहे. बुमराहने आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपल्याला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे.
-
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या यॉर्कर आणि स्लोअर बॉल्सने फलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. मात्र, संजना गणेशनच्या प्रेमात स्वतः जसप्रीत बुमराह क्लीन बोल्ड झाला.
-
बराच काळ गुपचूप एकमेकांना डेट केल्यानंतर, बुमराह आणि संजनाने 21 मार्च 2021 रोजी लग्न केले. पण, या जोडप्याच्या नात्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का?
-
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांची पहिली भेट २०१९ विश्वचषकादरम्यान झाली. बुमराह या स्पर्धेचा भाग असताना संजना ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी इंग्लंडला पोहोचली होती.
-
यावेळेस दोघेही पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. पण, विशेष म्हणजे यावेळी दोघेही एकमेकांना अहंकारी मानायचे.
-
एका मुलाखतीमध्ये बुमराहने स्वतः त्याच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. तेव्हा तो म्हणाला, “मी संजनाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला ती गर्विष्ठ वाटली. पण, तीही माझ्याबद्दल असाच विचार करायची हे जाणून मला आश्चर्य वाटलं.”
-
याच कारणामुळे बुमराह आणि संजनाची पाहिली भेट चांगली झाली नाही. मात्र, जसजसे ते एकमेकांना भेटू लागले तेव्हा ते एकमेकांना समजू लागले आणि चांगले मित्र बनले.
-
बुमराहला संजनाला खेळाची असलेली समज खूप जास्त आवडते. तो म्हणतो, ‘खेळाडू कोणत्या टप्प्यातून जात आहे आणि त्याला कशाची गरज आहे हे तिला चांगले समजते.’
-
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी 2019 च्या विश्वचषकादरम्यान मैत्रीनंतर एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. पण त्यांनी कोणाला कळू दिले नाही की ते रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
अचानक त्यांच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. दोघांनीही 21 मार्च 2021 रोजी जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न केले.
आधी एकमेकांना म्हणायचे अहंकारी, मग पडले प्रेमात! ‘अशी’ आहे संजना-जसप्रीतची प्रेमकहाणी
जसप्रीत बुमराह व संजना गणेशन यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का?
Web Title: Asia cup indian cricket team first they called each other arrogant when they fell in love amazing love story of sanjana jasprit bumrah pvp