Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. prime minister narendra modi inaugurated the foundation laying ceremony of the new cricket stadium in varanasi vbm

Varanasi Stadium: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी झालेले वाराणसीचे नवीन स्टेडियम कसे असेल? पाहा फोटो

Varanasi Cricket Stadium : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील गंजरी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली. हे स्टेडियम ४५० कोटी रुपये खर्चून बांधले जाणार आहे. ३० एकर जागेवर बनवले जाणारे क्रिकेट स्टेडियम खूप खास आहे. हे स्टेडियम स्वतः महादेवाला समर्पित असल्याचे पीएम मोदींनी सांगितले.

September 23, 2023 19:02 IST
Follow Us
  • Prime Minister Narendra Amodi laid the foundation stone of the International Cricket Stadium in Varanasi
    1/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, २३ सप्टेंबर रोजी वाराणसीमध्ये भगवान शिव-थीम असलेल्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. १२१ कोटी रुपयांच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या या स्टेडियमसाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Source: @myogiadityanath/twitter)

  • 2/9

    या स्टेडियमचे फ्लडलाइट त्रिशूळाच्या आकारात असतील. स्टेडियमच्या पायाभरणीपूर्वी पीएम मोदींच्या अकाऊंटवरून स्टेडियमचे अनेक अॅनिमेटेड फोटो शेअर करण्यात आले आहेत. (Source: the_india_moment/instagram)

  • 3/9

    वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या पायाभरणीसाठी आलेल्या सचिन तेंडुलकरने श्री काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. (Source: @mufaddal_vohra/twitter)

  • 4/9

    स्टेडियमच्या सजावटीसाठी बेलपत्राच्या आकाराचे धातूचे पत्रे वापरले जाणार आहेत. कारण भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केले जाते. (Source: the_india_moment/instagram)

  • 5/9

    सचिन तेंडुलकरने नरेंद्र मोदींना खास जर्सी भेट दिली. या जर्सीच्या समोरील बाजूवर टीम इंडिया लिहिलेले आहे, तर मागे ‘नमो’ असे नाव लिहले आहे. (Source: @DDNewsHindi/twitter)

  • 6/9

    या स्टेडियमचा एक भाग ड्रमच्या आकारात असेल. पायाभरणीनंतर पंतप्रधान म्हणाले की, हे स्टेडियम पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित असेल. (Source: the_india_moment/instagram)

  • 7/9

    बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेटवस्तू दिली. या कार्यक्रमासाठी माजी क्रिकेटरही उपस्थित होते. (Source: @DDNewsHindi/twitter)

  • 8/9

    एआयच्या मदतीने तयार केलेल्या चित्रांमध्ये सामना पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक त्यांच्या गाड्या कुठे पार्क करू शकतील आणि स्टेडियम बाहेरून कसे दिसेल हे देखील दर्शविते. (Source: the_india_moment/instagram)

  • 9/9

    या स्टेडियमची आसन क्षमता अंदाजे ३०,००० असेल आणि त्यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण असणार आहे. (Source: the_india_moment/instagram)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: Prime minister narendra modi inaugurated the foundation laying ceremony of the new cricket stadium in varanasi vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.