-
धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी सामना खेळला गेला. या दोन्ही संघांच्या खेळाडूंना सामन्यात किती मानधन मिळते ते जाणून घेऊ.
-
भारतीय खेळाडूंचा मानधन न्यूझीलंडच्या खेळाडूंपेक्षा खूप जास्त आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या पगारात केंद्रीय करारापासून ते मॅच फीपर्यंत मोठी तफावत आहे.
-
दोन्ही संघातील खेळाडूंचे वेतन वेगवेगळे ठरवले जाते. एकीकडे, भारतीय खेळाडूंना चार श्रेणींमध्ये ठेवले जाते, तर न्यूझीलंडच्या खेळाडूंना मानांकनाच्या आधारे वेतन मिळते.
-
भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी केली असून प्रत्येक श्रेणीतील खेळाडूंचे वेतन वेगवेगळे आहे. या श्रेणी A+, A, B आणि C अशा आहेत.
-
A+ श्रेणीतील खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंचा समावेश आहे ज्यांना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. तर A श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, B श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि C श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतात.
-
दुसरीकडे, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डामध्ये खेळाडूंना त्यांच्या क्रमवारीनुसार (रँक) वेतन मिळते. या संघाचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू केन विल्यमसन आहे, ज्याला दरवर्षी ५,२३,३९६ न्यूझीलंड डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे २ कोटी ५४ लाख रुपये मिळतात.
-
न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंचे वेतन प्रत्येक क्रमवारीनुसार कमी होत जाते. उदाहरणार्थ, १०व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूचा पगार ४४४,१९६ न्यूझीलंड डॉलर्स (अंदाजे २.१५ कोटी रुपये) आणि २०व्या क्रमांकाच्या खेळाडूचा पगार २६७,१९६ न्यूझीलंड डॉलर्स (अंदाजे १.७८ कोटी रुपये) आहे.
-
त्याचप्रमाणे दोन्ही संघांच्या मॅच फीमध्येही मोठी तफावत आहे. भारतीय क्रिकेटपटूंना कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये आणि टी-२० साठी ३ लाख रुपये मिळतात.
-
त्याच वेळी, न्यूझीलंडच्या खेळाडूंना एका कसोटीसाठी १०,२५० न्यूझीलंड डॉलर (सुमारे ५ लाख रुपये), एकदिवसीय सामन्यासाठी ४००० न्यूझीलंड डॉलर (सुमारे २ लाख रुपये) आणि टी-२० साठी २५०० न्यूझीलंड डॉलर (सुमारे १.२१ लाख रुपये) मिळतात. (Photos Source: ESPNcricinfo)
PHOTOS: भारत आणि न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या मॅच फीमध्ये किती आहे तफावत? जाणून घ्या
India vs New Zealand Players Match Fee: भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या पगारात मोठी तफावत आहे. भारतात खेळाडूंना चार श्रेणींमध्ये ठेवले जाते, तर न्यूझीलंडमध्ये रँकच्या आधारे वेतन दिले जाते.
Web Title: Ind vs nz cricketers new zealand and india match fees know which team has highest salary vbm