Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india dream broken where exactly we loss final match against australia five important turning points rmm

भारताचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील ‘या’ पाच चुका जिथे सामना हातून निसटला

विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून भारताचा पराभव केला आहे.

Updated: November 20, 2023 08:51 IST
Follow Us
  • २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यात धडक मारली होती.
    1/11

    २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यात धडक मारली होती.

  • 2/11

    रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून भारताचा पराभव केला आहे.

  • 3/11

    भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या २४० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघाने ही धावसंख्या सहज गाठत सहा गडी राखून भारताचा पराभव केला. पण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत नेमका कुठे चुकला? जाणून घेऊयात पाच महत्त्वाचे टर्निंग पाँइंट्स..

  • 4/11

    संथ खेळपट्टीवर फलंदाजी करताना भारतीय सलामीवीरांना मोठे फटके मारण्यात अडचणी आल्या. रोहित शर्माने एका बाजुने आक्रमण फलंदाजी केली पण शुबमन गिलला अंतिम सामन्यात दमदार खेळी साकारता आली नाही.

  • 5/11

    मधल्या षटकांमध्ये संथ खेळी पाचव्या षटकात शुभमन गिल बाद झाल्यानंतर रोहित शर्माने आक्रमक खेळी सुरूच ठेवली. १० व्या षटकात बाद होण्यापूर्वी रोहितने ३१ चेंडूत ४७ धावांचे योगदान दिले. रोहित आऊट झाल्यानंतर भारताची धावसंख्या २ बाद ८० अशी होती. मात्र, ११ व्या षटकांत श्रेयस अय्यर अवघ्या ४ धावांवर बाद झाला.

  • 6/11

    विराट कोहली आणि केएल राहुलने चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला. ११ ते २० षटकांमध्ये भारताला १ गडी गमावून केवळ ३५ धावा करता आल्या. २१ ते ३० षटकांमध्ये भारताला १ गडी गमावून केवळ ३७ धावा करता आल्या. भारताने संपूर्ण डावात केवळ १३ चौकार आणि तीन षटकार मारले.

  • 7/11

    सूर्यकुमार यादवला उशिरा संधी दिली विराट कोहली आऊट झाल्यानंतर भारतीची धावसंख्या १४८ इतकी होती. विराट ६३ चेंडूत ५४ धावा करून बाद झाला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला येईल आणि मधल्या फळीत केएल राहुलला साथ देईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण रवींद्र जडेजा फलंदाजीला आला आणि तो २२ चेंडूत केवळ ९ धावा करू शकला. त्याला भारताच्या धावगतीला वेग देता आला नाही.

  • 8/11

    मोहम्मद सिराजला लवकर गोलंदाजी दिली नाही विश्वचषक २०२३ मध्ये भारताच्या सलग १० विजयांमध्ये गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची वेगवान जोडी संघाला लवकर यश मिळवून देण्यात विशेष प्रभावी ठरली. मात्र, अंतिम सामन्यात रोहित शर्माने बुमराह आणि मोहम्मद शमीसह गोलंदाजीला सुरुवात केली. पण मोहम्मद सिराजला नवीन चेंडू न सोपवणं भारतासाठी हानिकारक ठरल्याचं दिसतं.

  • 9/11

    ऑस्ट्रेलियावर दबाव आणता आला नाही… माफक धावसंख्येचा बचाव करताना भारताने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला ४७ धावांत तीन विकेट्स घेत पिछाडीवर टाकले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला सुरुवातीला विकेट्स मिळाल्यामुळे भारताच्या जिंकण्याच्या संधी वाढल्या होत्या. मात्र, भारतीय संघाला अनुकूल परिस्थितीचा फायदा घेता आला नाही. प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्यात भारत अपयशी ठरला.

  • 10/11

    ट्रॅव्हिस हेड (१३७) आणि मार्नस लाबूशेन (५८) यांनी चौथ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला.

  • 11/11

    सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस

TOPICS
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाInd vs Ausरोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohliविश्वचषक २०२३World Cup

Web Title: India dream broken where exactly we loss final match against australia five important turning points rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.