-
भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा केल्या. जयस्वालने या 5 सामन्यात (9 डाव) 712 धावा केल्या आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला.
-
या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याच्या नावावर 1,000 हून अधिक धावा आणि दोन द्विशतके आहेत. जैस्वालच्या या कामगिरीसाठी सर्वांना त्याचं कौतुक आहे.
-
आपल्या खेळाव्यतिरिक्त यशस्वी जैस्वालने आपल्या जीवनात ही आणखी चांगली कामगिरी केली आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी केलं आहे .
-
जेव्हा यशस्वी जैस्वाल क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आला होता तेव्हा त्याला आझाद मैदानावर तंबूत राहावे लागले होते आणि आता त्याच मुंबईत त्याने कोटींचे ड्रीम होम विकत घेतले आहे.
-
यशस्वी जैस्वाल ला हे चांगले दिवस पाहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे कारण मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर असणे खूप मोठी गोष्ट आहे.
-
यशस्वी जैस्वालचे नवीन घर अगदी स्वप्नवत आहे. या सुंदर घरासाठी यशस्वी जैस्वालने 5.38 कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
या घरासाठी यशस्वीचे आई-वडील आणि त्याचा भाऊ अत्यंत आनंदी आहेत कारण या क्रिकेटरने त्याच्या मेहनतीने आपल्या कुटुंबाला एक अनपेक्षित जीवन दिले आहे.
-
यशस्वीच्या कुटुंबाने त्याला त्याच्या उत्कृष्टतेच्या शोधात पाठिंबा दिला आणि अनेक संकटे पाहिल्यानंतर ते खरोखरच या सुखास पात्र आहेत.
-
या शुभ प्रसंगी त्याच्या चाहत्यांनी त्याला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो: यशस्वी जैस्वाल इन्स्टाग्राम अकाऊंट)
Photos: मुंबईत तंबूत राहिल्यानंतर यशस्वी जैस्वालचे कोटींचे ड्रीम हाउस ; किंमत जाणून बसेल धक्का
या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याच्या नावावर 1,000 हून अधिक धावा आणि दोन द्विशतके आहेत. जैस्वालच्या या कामगिरीसाठी सर्वांना त्याचं कौतुक आहे. आपल्या खेळाव्यतिरिक्त यशस्वी जैस्वालने आपल्या जीवनात ही आणखी चांगली कामगिरी केली आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी केलं आहे.
Web Title: Yashasvi jaiswal crores dream house after living in a tent in mumbai you will be shocked to know the price arg 02