• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know all the records of sunrisers hyderabad vs mumbai indians match of ipl 2024 vbm

PHOTOS : आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात हैदराबाद-मुंबईने पाडला विक्रमांचा पाऊस, पाहा संपूर्ण यादी

MI and SRH match records list : एसआरएच आणि एमआय यांच्यातील सामन्यात धावांचा पाऊस पडला. या सामन्यात हैदराबाद आणि मुंबईने एकूण ५३२ धावा केल्या, जे कोणत्याही पुरुषांच्या टी-२० सामन्यातील सर्वाधिक धावा आहेत. त्याचबरोबर या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले.

March 28, 2024 22:56 IST
Follow Us
  • MI and SRH match records list in IPL 2024
    1/9

    सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या (२७७) उभारली. यापूर्वी हा विक्रम आरसीबीच्या नावावर होता. आरसीबीने २०१३ पुणे वॉरियर्सविरुद्ध २६३ धावा केल्या होत्या. (Photo Source – IPL X)

  • 2/9

    मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात ४० षटकात ५२३ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच दोन्ही डावांत मिळून ५०० हून अधिक धावा केल्या गेल्या. (Photo Source – IPL X)

  • 3/9

    या सामन्यात विक्रमी ३८ षटकार मारले गेले. त्याचवेळी दोन्ही संघातील एकूण ४ फलंदाजांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. (Photo Source – SRH X)

  • 4/9

    आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या नावावर होता. राजस्थानने पंजाबविरुद्ध २२६ धावा करुन सामना जिंकला होता.त्याचबरोबर आता मुंबईने दुसऱ्या डावात सर्वाधिक २४६ धावा केल्या. (Photo Source – IPL X)

  • 5/9

    या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी अभिषेक शर्माने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने हेडचा (१८) विक्रम मोडतान अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. (Photo Source – SRH X)

  • 6/9

    या सामन्यात ३८ षटकारांशिवाय ६९ चौकार मारले गेले. यापूर्वी आयपीएल २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात ६९ चौकार मारले होते. (Photo Source – IPL X)

  • 7/9

    मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाने आयपीएल पदार्पणात ६६ धावा केल्या. आयपीएलच्या एका डावात कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावांच्या बाबतीत संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Photo Source – IPL X)

  • 8/9

    सनरायझर्स हैदराबादच्या डावात १८ षटकार मारले गेले, जे कोणत्याही आयपीएल सामन्यातील या संघासाठी सर्वाधिक आहेत. यापूर्वी, चालू आयपीएल हंगामातच त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १५ षटकार ठोकले होते. (Photo Source – IPL X)

  • 9/9

    सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्ये ८१ धावा केल्या, जी आयपीएलमधील त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या होती. यापूर्वी २०१७ मध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ७९ धावा केल्या होत्या. (Photo Source – IPL X)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Know all the records of sunrisers hyderabad vs mumbai indians match of ipl 2024 vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.