Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. icc t20 world cup 2024 team india ready for icc t20 world cup lets know about players special records in t20 arg

ICC T20 World Cupसाठी भारतीय संघ सज्ज; जाणून घ्या खेळाडूंच्या टी-२० मधील खास रेकॉर्डसबद्दल 

टी-२० विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे आणि रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी आहे तर विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. जाणून घेऊया जाणून घ्या खेळाडूंच्या टी-२० मधील खास रेकॉर्डसबद्दल.

May 2, 2024 14:57 IST
Follow Us
  • India T20 World Cup squad
    1/16

    टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी आहे, तर हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
    जाणून घेऊया आगामी टी-२० स्पर्धेसाठी भारताच्या घोषित १५ खेळाडूंच्या कामगिरीबद्दल. (फोटो – बीसीसीआय)

  • 2/16

    रोहित शर्माने एकूण १५१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये रोहितने ३१.७९ च्या सरासरीसह १३९.३७ च्या स्ट्राइक रेटने एकूण ३९९४ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषका मध्ये रोहितच्या नावावर ५ शतक आणि २९ अर्धशतक आहेत. (फोटो – रोहित शर्मा इंस्टाग्राम)

  • 3/16

    टी-२० विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिकने भारतासाठी एकूण ९२ टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २५.४३ च्या सरासरीने त्याने १३४८ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये हार्दिकने ३ अर्धशतके झळकावली आहेत आणि आपल्या गोलंदाजीत त्याने ७३ बळी घेतले आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये हार्दिकची सर्वोत्तम कामगिरी करत १६ धावांत ४ विककेट्स घेतल्या होत्या. (फोटो – इंस्टाग्राम)

  • 4/16

    यशस्वी जैस्वालने भारतासाठी १७ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ३३.४६ च्या सरासरीने त्याने ५०२ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने टी-२० विश्वचषकामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतके झळकावली आहेत. या सामन्यामध्ये त्याने १६१.९३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. (फोटो – यशवी जैस्वाल इंस्टाग्राम)

  • 5/16

    विराट कोहलीने भारतासाठी एकूण ११७ टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये ५१.७५ च्या शानदार सरासरी आणि १३८,१५ स्ट्राइक रेटसह त्याने ४०३७ धावा केल्या आहेत. विराटने टी-२० मध्ये १ शतक आणि ३७ अर्धशतके झळकावली आहेत. (फोटो – विराट कोहली इंस्टाग्राम)

  • 6/16

    सूर्यकुमार यादव हा खेळाडू आपल्या कामगिरीमुळे टी-20 स्पेशालिस्ट मानला जातो त्याने भारतासाठी एकूण ६० सामने खेळले असून ४५.५५ च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने टी-२० विश्वचषकामध्ये ४ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत. (फोटो – सूर्यकुमार यादव इंस्टाग्राम)

  • 7/16

    अपघातानंतर ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी पुनरागमन करणार आहे आणि यंदाच्या आयपीएलमध्येही तो शानदार कामगिरी करत आहे. यामुळे त्याची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतासाठी त्याने ६६ टी-२० सामन्यांमध्ये २२.४३ च्या सरासरीने त्याने एकूण ९८७ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर ३ अर्धशतके देखील आहेत. यष्टिरक्षक म्हणून त्याने २७ कॅच पकडून ९ स्टंपिंग रेकॉर्ड केले आहेत. (फोटो – ऋषभ पंत इंस्टाग्राम)

  • 8/16

    भारतीय संघामध्ये दुसरा यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. संजू सॅमसनने भारतासाठी एकूण २५ टी-20 सामन्यांमध्ये १८.७० च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. १३३.०९ स्ट्राइक रेटने संजू सॅमसनच्या नावावर १ अर्धशतक आहे आणि यष्टिरक्षक म्हणून त्याने एकूण १४ कॅच पकडले आहेत ४ स्टंपिंग रेकॉर्ड ही आहे. (फोटो – संजू सॅमसन इंस्टाग्राम)

  • 9/16

    आयपीएलमधील आपल्या शानदार कामगिरीमुळे शिवम दुबेची निवड टी-२० विश्वचषकासाठी करण्यात आली आहे. शिवम दुबेने भारतासाठी एकूण २१ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ३९.४२ च्या सरासरी आणि १४५.२६ च्या स्ट्राइक रेटने त्याने २७६ धावा केल्या आहेत. शिवम दुबेच्या नावावर ३ अर्धशतक देखील आहेत आणि आपले गोलंदाजीतही त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो – शिवम दुबे इंस्टाग्राम)

  • 10/16

    रवींद्र जडेजाने भारतासाठी ६६ सामन्यात ५३ विकेट घेतल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये २१ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-२० विश्वचषकामध्ये जाडेजा ७.१० च्या इकॉनॉमीने खेळतो. जडेजाने आपल्या फलंदाजीत १२५.३२च्या स्ट्राइक रेटसह ४८० धावा केल्या आहेत. (फोटो – रवींद्र जडेजा इंस्टाग्राम)

  • 11/16

    टी-२० विश्वचषकामध्ये गोलंदाज अक्षर पटेलची दुसरा फिरकी अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने भारतासाठी ५२ सामन्यात ४९ विकेट घेतल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये ९ धावांमध्ये ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-२० विश्वचषकामध्ये अक्षर पटेल ७. २६ च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करतो. आपल्या फलंदाजीत त्याने ३६१ धावा करत एक अर्धशतक देखील झळकावले आहे. (फोटो – अक्षर पटेल इंस्टाग्राम)

  • 12/16

    कुलदीप यादवने भारतासाठी ३५ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५९ विकेट घेतल्या आहेत. टी-२० सामन्यामध्ये १७ धावा ठेवून ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-२० सामन्यामध्ये कुलदीप यादव ६.७४ ची इकॉनॉमीने खेळतो. (फोटो कुलदीप यादव – इंस्टाग्राम)

  • 13/16

    युजवेंद्र चहलने भारतासाठी एकूण ८० सामन्यामध्ये ९६ विकेट घेतल्या आहेत. टी-२० सामन्यामध्ये २५ धावांमध्ये ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. युजवेंद्र चहलने ८.१९ इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. युजवेंद्र चहलला सामन्यामध्ये दोनदा ४ पेक्षा जास्त विकेट घेण्यात यश आले आहे. (फोटो – चहल इंस्टाग्राम)

  • 14/16

    वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारतासाठी एकूण ४४ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६२ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० सामन्यामध्ये अर्शदीप ८.६३ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. सामन्यामध्ये ३७ धावांमध्ये ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. (फोटो – अर्शदीप सिंग इंस्टाग्राम)

  • 15/16

    भारताचा यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणजे जसप्रीत बुमराह, ज्याने भारतासाठी एकूण ६२ सामन्यात ७४ विकेट घेतल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये ११ धावांमध्ये ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुसामन्यामध्ये बुमराह ने ६.५५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. (फोटो – जसप्रीत बुमराह इंस्टाग्राम)

  • 16/16

    मोहम्मद सिराजने भारताकडून १० सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत. सिराजने ८.७९ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये १७ धावांमध्ये ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
    (फोटो – मोहम्मद सिराज इंस्टाग्राम)

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Icc t20 world cup 2024 team india ready for icc t20 world cup lets know about players special records in t20 arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.