-
टी-२० विश्व चषक स्पर्धेला लवकरच सुरवात होणार आहे. या वर्षीचा टी-२० विश्वचषक २०२४ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आला आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा २ जून २०२४ रोजी युनायटेड स्टेट्समध्ये सुरू होणार आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
२०२३ मध्ये विश्व चषकात आपल्या शानदार खेळीने ऑस्ट्रेलिया संघाने विजेतेपद पटकावले होते. (फोटो : टीम ऑस्ट्रेलिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
जाणून घेऊया या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंबद्दल. (फोटो : टीम ऑस्ट्रेलिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
यंदा टी-२० विश्व चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधारपद हे मिच मार्श कडे असणार आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियन संघात डेथ-ओव्हर स्पेशालिस्ट नॅथन एलिसचा समावेश केला गेला आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियन वेगवान बॉलर्सच्या यूनिटमध्ये पॅट कमिन्स दिसणार आहे. (फोटो : टीम ऑस्ट्रेलिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
२०२३ विश्व चषक स्पर्धेमध्ये आपल्या उत्तम कामगिरीमुळे २०२४ च्या टी-२० स्पर्धेसाठी मिचेल स्टार्कला ही संघात सामील केले गेले आहे. (फोटो : टीम ऑस्ट्रेलिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
वेगवान गोलंदाजांच्या यादीत जोश हेझलवूड, ॲश्टन अगर आणि ॲडम झाम्पा यांचा देखील समावेश आहे. (फोटो : टीम ऑस्ट्रेलिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
ऑस्ट्रेलियन संघात कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस हे अष्टपैलू खेळाडू आहेत.
(फोटो : टीम ऑस्ट्रेलिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट) -
यंदा आपल्या जोरदार फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियन संघाने टीम डेव्हिड, ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश केले आहे.
(फोटो : टीम ऑस्ट्रेलिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट) -
ऑस्ट्रेलिया संघासाठी जोश इंग्लिस आणि मॅथ्यू वेड हे विकेट कीपिंग करणार आहेत.
(फोटो : टीम ऑस्ट्रेलिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
T20 WC 2024: विश्व चषक २०२३ चे विजेतेपद पटकावून आता टी-२० स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघ सज्ज ; पाहा खेळाडूंची यादी
जाणून घेऊया या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंबद्दल.
Web Title: After winning the title of world cup 2023 australia team is now ready for the world t20 tournament see the list of players arg 02