• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. t20 world cup 2024 oldest players list frank nsubuga mohammed nabi rohit sharma bdg

T20 WC 2024: रोहित शर्मा नाही ‘या’ संघाचा गोलंदाज वर्ल्डकपमधील सर्वात वयस्कर खेळाडू, पाहा यादी

Oldest Players List of T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक २०२४ ला सुरूवात झाली असून चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. यंदा विश्वचषकात खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू कोण आहेत, हे जाणून घेऊया.

Updated: June 6, 2024 15:19 IST
Follow Us
    Oldest Players List in T20 World Cup 2024
    टीम साऊदी
    न्यूझीलंड संघाने अनुभवी गोलंदाज टीम साऊदीला टी-२० विश्वचषक २०२४ संघात संधी दिली आहे. ज्याचं वय ३५ वर्षे आणि १४० दिवस आहे.
    इमाद वसीम
    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या इमाद वसीमची यंदाच्या टी-२० विश्वचषकात निवड करण्यात आली आहे. त्याचं वय ३५ वर्षे आणि १५८ दिवस आहे.
    मॅथ्यू वेड
    दोन वेळा टी-२० चॅम्पियन असलेल्या संघात मॅथ्यू वेड हा वयस्कर खेळाडू आहे, ज्याचं वय ३६ वर्षे आणि १२७ दिवस आहे.
    मोईन अली
    इंग्लंड संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अली देखील टी-२० वर्ल्डकप संघाचा भाग आहे, ज्याचं वय ३६ वर्षे आणि ३१७ दिवस आहे.
    अँजेलो मॅथ्यूज
    श्रीलंकेच्या ताफ्यातील अनुभवी खेळाडू आणि टाईमआऊट होणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू अँजेलो मॅथ्यूजही वयस्कर खेळाडूंच्या यादीत आहे, ज्याचं वय ३६ वर्षे आणि ३४२ दिवस आहे.
    रोहित शर्मा
    भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासुद्धा वयस्कर खेळाडूंच्या यादीत आहे. जो चौथ्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, त्याच वय ३७ वर्षे आणि ३४ दिवस आहे.
    महमुदुल्लाह
    बांगलादेशच्या संघात महमुदुल्लाह या सर्वात वयस्कर खेळाडूला संधी दिली आहे. ज्याचं नाव ३८ वर्षे आणि १०० दिवस आहे.
    मोहम्मद नबी
    अफगाणिस्तानच्या संघातील सर्वात अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी हा वयस्कर खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याचं वय ३९ वर्षे आणि १२१ दिवस आहे.
    फ्रँक नसुबुगा
    टी-२० विश्वचषक २०२४ मधील सर्वात वयस्कर खेळाडूचे वय हे ४३ वर्षे
    २५४ दिवस आहे, जो युगांडा संधाचा खेळाडू असून त्याच नाव फ्रँक नसुबुगा आहे.
TOPICS
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024टी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024मराठी बातम्याMarathi Newsरोहित शर्माRohit Sharma

Web Title: T20 world cup 2024 oldest players list frank nsubuga mohammed nabi rohit sharma bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.