-
वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत झाला आहे. सौरभने आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व देखील केले.
-
यानंतर आपल्या पुढील शिक्षणासाठी सौरभ अमेरिकेत गेले. मात्र तिथेही सौरभला क्रिकेटची आवड सोडता आली नाही. पुढे सौरभ अमेरिकेच्या क्रिकेट संघात सामील झाला.
-
आज भारत विरुद्ध यूएसएचा टी-२० विश्वचषक सामना रंगणार आहे. या सामन्यात सौरभ आपल्या जन्मभूमी विरुद्ध खेळणार आहे. जाणून घेऊया त्याचे खास विक्रम.
-
२०१८ साली सौरभची पहिल्यांदाच यूएस संघात निवड झाली होती. त्याच्या कामगिरीमुळे फेब्रुवारी २०१९ मध्ये सौरभला संघाचे कर्णधारपद दिले गेले.
-
२०२२ मध्ये झिम्बाब्वे येथे आयसीसी टी-२० विश्वचषक ग्लोबल क्वालिफायर बी स्पर्धेत सौरभने भाग घेतला होता. या स्पर्धेत सौरभने एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या.
-
टी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात ५ विकेट घेणारा सौरभ पहिला अमेरिकन खेळाडू आहे.
-
टी-२० आंतराष्ट्रीय २९ सामन्यामध्ये सौरभने २९ विकेट्स घेतल्या आहेत.
-
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सौरभने ४८ सामने खेळून ७३ विकेट्स घेतल्या आहेत.
-
वेगवान गोलंदाजीसह सौरभने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ४८ सामने खेळून १३९ धावा केल्या आहेत.
-
(सर्व फोटो : सौरभ नेत्रावळकर/इन्स्टाग्राम)
अमेरिकेला पाकिस्तानविरुध्द विजय मिळवून देण्यात निर्णायक सौरभ नेत्रावळकर आज मायदेशाविरुध्द खेळणार; जाणून घ्या विक्रम
IND VS USA: यूएसए संघाला जबरदस्त विजय मिळवून देणारा सौरभ नेत्रावळकर आज खेळणार आपल्या मायदेशाविरुध्द जाणून घ्या सौरभचे विक्रम.
Web Title: Saurabh netravalkar who was decisive in helping america win against pakistan will play against the home country today know his record arg 02