• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mandira bedi faced discrimination after becoming a cricket host read her journey from actor to host arg

‘मला कोणाचाही पाठिंबा नव्हता…’ क्रिकेट होस्ट बनल्यानंतर मंदिरा बेदीला सहन करावा लागला होता भेदभाव; जाणून घ्या प्रवास

प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेट होस्ट मंदिरा बेदीने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की २००३ क्रिकेट विश्वचषकादरम्यान तिला भेदभावाचा सामना करावा लागला. तिने उघड केले की पुरुष क्रिकेटपटू आणि काही सहकाऱ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते.

June 14, 2024 19:39 IST
Follow Us
  • bedding temple
    1/9

    अभिनेत्री मंदिरा बेदीने टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. जेव्हा त्यांनी क्रिकेटविश्वात क्रिकेट होस्ट म्हणून सुरुवात केली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते.

  • 2/9

    खरंतर, त्या काळात क्रिकेट शोमध्ये महिला होस्ट क्वचितच दिसत होत्या, परंतु मंदिराने शोमध्ये केवळ होस्टची भूमिकाच केली नाही तर एका क्रिकेट एक्स्पर्टची भूमिकाही बजावली. पण सुरुवातीला मंदिराला क्रीडा जगात भेदभावाचा सामना करावा लागला होता.

  • 3/9

    ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने असे सांगितले की ती एक आठवडा दररोज रडायची, त्यानंतर तिच्या आयुष्यात मोठे बदल झाले.

  • 4/9

    अभिनेत्रीने सांगितले की, तिला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. मैत्रिणींसोबत ती क्रिकेटवर गप्पा मारायची. २००२ साली भारताने इंग्लंडचा पराभव करून चॅम्पियन ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. हा सामना पाहण्यासाठी तिने तिच्या मैत्रिणींकडून तिकीट मागितले होते आणि सामना पाहण्यासाठी ती कोलंबोला गेली होती.

  • 5/9

    यावेळी मंदिराने सोनी मॅक्सच्या प्रमुख स्नेहा रजनी यांची भेट घेतली आणि दोघांनीही क्रिकेटबद्दल खूप चर्चा केली. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, मुंबईला परतल्यानंतर एका महिन्यानंतर तिला २००३ च्या विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी सोनीकढून फोन आला.

  • 6/9

    यासाठी हजारो मुलींनी ऑडिशन दिले होते, पण स्नेहा यांनी मंदिरा बेदीची निवड केली. मंदिराने पुढे सांगितले की, तिच्यासाठी होस्टिंग करणे सोपे नव्हते कारण ती पॅनेलमध्ये स्थान मिळविणाऱ्या पहिल्या काही महिलांपैकी एक होती.

  • 7/9

    “पॅनलवर बसलेले ज्येष्ठ लोक पॅनेलवर एका महिलेला बसवण्याच्या बाजूने नव्हते. मी काही प्रश्न विचारायचे, जरी माझे प्रश्न खूपच बालिश असले तरी पॅनेलवरील लोक त्याकडे दुर्लक्ष करायचे. मी खूप रडायचे आणि होस्टिंगदरम्यान अडखळत देखील होतो.” असं मंदिराने सांगितले.

  • 8/9

    अभिनेत्री पुढे म्हणाली, मला कोणाचाही पाठिंबा नव्हता. एका आठवड्यानंतर, मला समजावून सांगण्यात आले की सामान्य माणसाप्रमाणे क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारावेत. यानंतर मी स्वतःमध्ये बदल केले आणि मग मी क्रिकेटचा आनंद घेऊ लागले.”

  • 9/9

    मंदिरा बेदी यांनी २००३ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप होस्ट केला होता. मंदिराने २००४ आणि २००६ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल सीझन२ देलहिक कव्हर केले आहे.(फोटो : मंदिरा बेदी/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Mandira bedi faced discrimination after becoming a cricket host read her journey from actor to host arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.