• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. afghanistan women request icc to help set up refugee team in australia wants to play at international level spl

PHOTOS : ‘या’ देशातील महिला क्रिकेटपटू चिंतेत; आयसीसीसमोर हात जोडून मागितली मदत! वाचा काय आहे प्रकरण?

अलीकडेच अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंनी केलेल्या भावनिक आवाहनाने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्याकडून मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Updated: July 2, 2024 18:49 IST
Follow Us
  • Afghanistan
    1/7

    अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी केली आहे. अलीकडेच या संघाने T20 विश्वचषक-2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारून सर्वांना आश्चर्यचकित केले ते.परंतु दुसरीकडे,अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) मदतीसाठी आवाहन करावे लागले आहे.

  • 2/7

    अफगाण महिला क्रिकेट संघाकडून त्यांचे क्रिकेट पुढे चालू राहावे त्यामध्ये आणखीन अधिक चांगली कामगिरी करता यावी यासाठी अलीकडेच संघाच्या 17 माजी खेळाडूंनी आयसीसीसमोर एक मागणी मांडली आहे.

  • 3/7

    या महिलांनी आयसीसीला पत्र लिहून ऑस्ट्रेलियात निर्वासित संघ तयार करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयसीसीकडे या मदतीसाठी विनंती केली आहे.

  • 4/7

    दरम्यान,अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर 2021 मध्ये क्रिकेटसह इतर खेळातील महिला संघांवर बंदी घालण्यात आली होती. या कारवाईवर जोरदार टीकाही झाली होती.

  • 5/7

    आता अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटूने आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना पत्र लिहून निर्वासित महिला संघाप्रमाणे खेळायचे असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आयसीसीकडे निधीचीही मागणी केली आहे.

  • 6/7

    क्रिकेटपटूने पुढे लिहिले आहे की या संघाच्या स्थापनेमुळे सर्व अफगाणी महिला एका बॅनरखाली खेळू शकतील. या पत्रात असेही लिहिले आहे की, त्यांना सध्या एसीबीकडून मान्यता मिळणार नाही, पण अफगाणिस्तानच्या युवा महिला क्रिकेटपटूंना पुन्हा एक करून त्यांना खेळायला बाहेर काढून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचे त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे.

  • 7/7

    दरम्यान, तालिबान राजवट आल्यानंतर अनेक अफगाणी महिला खेळाडूंनी अफगाणिस्तान सोडून परदेशात आश्रय घेतला आहे. बहुतेक महिला फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थायिक झाल्या आहेत. (Photos Source: ESPNcricinfo and Reuters) (हे देखील वाचा- PHOTOS : तुम्हाला इंडिया गेटचे पूर्ण नावं माहित नसणारं! वास्तू बांधण्यासाठी १० वर्ष ल…)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Afghanistan women request icc to help set up refugee team in australia wants to play at international level spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.