-
भारतीय क्रिकेट संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चॅम्पियन संघासोबत ट्रॉफी हातात घेताना दिसत होते. मात्र पंतप्रधानांचे हात ट्रॉफीला स्पर्श झाले नाहीत. काय घडलं त्यावर एक नजर टाकूया (पीटीआय)
-
आफ्रिकेतून T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती आणि आज (४ जुलै) भारतीय संघ आपल्या देशात परतला. (पीटीआय)
-
टीम इंडिया दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर लोकांनी जल्लोषात स्वागत केले. यानंतर टीम आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचली. काही वेळाने भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचला, या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (पीटीआय)
-
संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना दिसले. (पीटीआय)
-
भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचला. यावेळी संघाच्या खेळाडूंनी ‘इंडियन चॅम्पियन्स’ नावाची खास जर्सी परिधान केली होती. (पीटीआय)
-
पंतप्रधानांसोबतच्या भेटीत टीम इंडियाच्या सदस्यांनी नाश्ताही केला. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ मुंबईला रवाना झाला. (पीटीआय)
-
पंतप्रधान विराट कोहलीसोबत फोटो क्लिक करताना दिसले. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आपल्या चॅम्पियन्ससोबत सर्वोत्तम भेट झाली, 7 LKM येथे विश्वविजेत्या संघाचे स्पर्धेदरम्यानचे अनुभव ऐकले, संस्मरणीय संभाषण ठरलं.”(पीटीआय)
-
विश्वचषक ट्रॉफीसोबत फोटोसाठी पोझ देताना पीएम मोदींनी ट्रॉफी हातात घेण्याऐवजी रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा हात धरला. (पीटीआय)
-
खरेतर, असे म्हटले जाते की केवळ काही निवडक लोकांना अधिकृतपणे आपल्या हातांनी ट्रॉफीला स्पर्श करण्याची परवानगी आहे ज्यात स्पर्धा जिंकणारे खेळाडू आणि व्यवस्थापक किंवा काही अधिकारी असू शकतात. कदाचित हे लक्षात घेऊन पीएम मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला हाताने स्पर्श केला नसावा, असे जाणकार सांगत आहेत. (पीटीआय) हेही पाहा- PHOTOS : विश्वविजयानंतर मायदेशी परतले इंडियन क्रिकेटचे अजिंक्य तारे; भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत!
PHOTOS : T20 विश्वचषकाच्या ट्रॉफीला हात न लावता नरेंद्र मोदींनी काढला फोटो, काय आहे कारण?
Team India PM Modi Meeting Pictures, Why did PM Modi not hold the World Cup trophy, Rohit Sharma, Virat Kohli: दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन टीम इंडिया मुंबईला रवाना झाली. टीमसोबतच्या भेटीदरम्यान पीएम मोदींनी ट्रॉफीसोबत काढलेल्या फोटोमध्ये ट्रॉफीला स्पर्श करण्याऐवजी त्यांनी रोहित आणि राहुल द्रविडच्या हातांना स्पर्श केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
Web Title: Team india and pm narendra modi meeting why did pm modi not hold the t20 world cup trophy spl