• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who is manu bhaker created history in paris olympics 2024 wins bronze she is expert in these sports too vbm

Manu Bhaker : मनू भाकेरच्या वडिलांनी तिच्यासाठी सोडली होती नोकरी, ‘या’ खेळांमध्येही आहे पारंगत, पाहा फोटो

Manu Bhaker created history in Paris Olympics 2024 : मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. मनू भाकेर ही एकेकाळी विविध खेळांमध्येही पारंगत होती, ज्यात तिने अनेक पदके जिंकली आहेत.

Updated: July 28, 2024 22:15 IST
Follow Us
  • India in Paris Olympics 2024
    1/9

    नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. तिने १-मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. मनू भाकेर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे. यासह 2024 च्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू भाकेर कोण आहेत ते जाणून घेऊया: (PTI)

  • 2/9

    २२वर्षीय मनू भाकेरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मनू भाकरने 221.7 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले. कोरियाच्या ओ ये जिनने (243.2 गुण) सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी कोरियन खेळाडू किम येजीने (241.3) दुसऱ्या स्थानावर रौप्यपदक पटकावले. (PTI)

  • 3/9

    मनू भाकेरचा जन्म हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात झाला. तिचे वडील राम किशन भाकर हे मर्चंट नेव्हीमध्ये मुख्य अभियंता आहेत. मनू भाकर नेमबाजीशिवाय इतर अनेक खेळांमध्येही निपुण आहे. (PTI)

  • 4/9

    वयाच्या १४ व्या वर्षी मनू भाकेरने मार्शल आर्ट्स, बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगमध्ये चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकेही जिंकली आहेत.(@bhakermanu/Insta)

  • 5/9

    मुन भाकेर ही ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय महिला आहे. गोल्ड कोस्ट 2018 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ती कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन देखील आहे, जिथे तिने CWG रेकॉर्डसह सुवर्ण जिंकले.(@bhakermanu/Insta)

  • 6/9

    त्याच वेळी, मुन भाकेर ही ब्यूनस आयर्स 2018 मधील युवा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज आणि पहिली महिला खेळाडू आहे. याशिवाय तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (@bhakermanu/Insta)

  • 7/9

    मनू भाकेर जेव्हा बॉक्सिंग करत असे, तेव्हा तिच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यानंतर तिने बॉक्सिंग सोडले. पण तिची खेळाची आवड संपली नाही आणि मग तिने नेमबाजीत आपल्या नवीन क्रीडा कारकिर्दीला सुरुवात केली. आज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून देशाचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (@bhakermanu/Insta)

  • 8/9

    विकिपीडियानुसार, जेव्हा मनू भाकेर 18 वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी नोकरी सोडली जेणेकरून ते आपल्या मुलीला तिच्या परवाना असलेल्या पिस्तूलच्या प्रशिक्षणासाठी घेऊन जातील. खरे तर सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना कोणत्याही अल्पवयीन व्यक्तीने पिस्तूल बाळगणे बेकायदेशीर आहे. (@bhakermanu/Insta)

  • 9/9

    मनू भाकेरला भारताचा प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा याने कोचिंग केले आहे. 2017 मध्ये, मनूने केरळमधील राष्ट्रीय स्पर्धेत नऊ सुवर्ण पदके जिंकून एक नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता.(@bhakermanu/Insta)

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024पॅरिसParisमराठी बातम्याMarathi Newsस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Who is manu bhaker created history in paris olympics 2024 wins bronze she is expert in these sports too vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.