-
पॅरिस ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. भारताच्या मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत ये जिन आणि ली वोंहो यांचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. दोघांनी हा सामना १६-१० अशा फरकाने जिंकला. मनू भाकेर बद्दल तुम्हा सर्वांनाच माहिती आहे पण आज सरबज्योत सिंग बद्दल जाणून घेऊया.
-
सरबज्योत सिंग हा हरियाणातील अंबाला येथील धीन गावचा रहिवासी आहे. त्यांचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत आणि आई हरदीप कौर गृहिणी आहेत.
-
सरबज्योत सिंगचे शिक्षण चंदीगड येथील डीएव्ही कॉलेजमध्ये झाले आहे. सरबज्योत सिंगचे प्रशिक्षक अभिषेक राणा आहेत. सरबजोत त्यांच्याकडून सेंट्रल फिनिक्स क्लब अंबाला येथे एआर शूटिंग अकादमी अंतर्गत प्रशिक्षण घेतो.
-
भारतीय नेमबाज सरबज्योत सिंग हा २०२२ मध्ये चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजी संघाचा भाग होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिव नरवाल यांनी १० मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत चीनचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.
-
याशिवाय आशियाई खेळांच्या नेमबाजी स्पर्धेत सरबजीत सिंगने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक देखील जिंकले आहे.
-
सरबजोतने २०२३ साली भोपाळ येथे झालेल्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. यासह त्याने २०२३ मध्ये बाकू येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
-
सरबज्योत सिंगने २०२१ मधील जागतिक चॅम्पियनशिपच्या वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.
-
याशिवाय सरबज्योत सिंगने आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे.
Olympic 2024: सरबज्योत सिंगने कोणाकडून घेतले नेमबाजीचे प्रशिक्षण? वाचा या २२ वर्षीय खेळाडूचा ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास
पॅरिस ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
Web Title: Olympic 2024 from whom sarabjot singh took shooting training read the 22 year olds journey to the olympics arg 02