-
सध्या पॅरिस मध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा सुरू आहे आणि आता पर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताने ३ कास्यपदक जिंकले आहेत.
-
या ऑलिम्पिक चॅम्पियनने २०२१ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. जाणून घ्या कशी असते नीरज चोप्राची ऑलिम्पिक खेळाची तयारी…
-
नीरज चोप्रा त्याच्या वर्कआउट दरम्यान कॅलरी बर्न करण्यासाठी कार्डिओ फॉलो करतो. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तो नियमित व्यायाम करतो.
-
नीरज चोप्राच्या आहारात फळांचा आणि प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश असतो. हे त्याच्या शरीरातील फट्सला निरोगी पातळीवर ठेवण्यास मदत करतात.
-
भालाफेक खेळासाठी त्याला शरीराची ताकद लक्षात घेऊन शरीराच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही भागांवर लक्ष केंद्रित करावे लागते.
-
खांद्याच्या सरावासाठी तो साइड राइज आणि डंबेल फ्रंट अशा टेक्निक वापरतो यामुळे खांद्याची ताकद वाढवण्यास मदत होते.
-
नीरज चोप्रा शरीराला आणखी बळकट करण्यासाठी वेट एक्सरसाइज देखील करतो.
-
(सर्व फोटो – नीरज चोप्रा/ इन्स्टाग्राम)
Paris Olympic 2024: ट्रेनिंग ते डाएट काय आहे ‘नीरज चोप्रा’चे फिटनेस रूटीन, जाणून घ्या कशी असते ऑलिम्पिक खेळाची तयारी…
भारताचा उत्कृष्ट भालाफेकपटू नीरज चोप्रा यंदाही आपल्या खेळीने भारतासाठी सुर्वर्ण पदक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.
Web Title: Paris olympic 2024 from training to diet what is neeraj chopra fitness routine know how he prepares for olympic games arg 02