-
अनेक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असतात. यातील काही क्रिकेटर्स त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत तर काही त्यांच्या घटस्फोटामुळे. जाणून घेऊया या दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल.
-
माजी भारतीय क्रिकेटपटू अरुण लाल यांनी २०२२ मध्ये बुलबुल साहासोबत दुसरं लग्न केलं.
-
माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांनी बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत दुसरं लग्न केलं. १९९६ मध्ये आपल्या पहिल्या पत्नी नौरीनशी घटस्फोट घेऊन त्यांनी संगीता बिजलानी यांचाशी लग्न केलं. पण अभिनेत्रीसोबतचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही आणि २०१० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
-
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी २००८ मध्ये पत्रकार माधवी पत्रावलीशी दुसरं लग्न केलं.
-
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी मुंबईतील मॉडेल अँड्रिया हेविटशी दुसरं लग्न केलं.
-
भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सतबीर कौरशी दुसरं लग्न केलं.
-
भारतीय विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने २००७ मध्ये निकिता वंजारासोबत लग्न केलं, परंतु २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि २०१५ मध्ये दिनेश कार्तिकने स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत दुसरं लग्न केलं.
-
२०१८ मध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांची पत्नी हसीन जहाँ यांनी घटस्फोट घेतला. हसीन जहाँ यांनी भारतीय क्रिकेटपटूवर अनेक आरोप केले यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या.
-
२०२३ मध्ये भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने आपल्या पत्नी आयेशा मुखर्जीशी घटस्फोट दिला.
Photos: दोनदा लग्नबंधनात अडकले आहेत ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटू तर कााहींनी घेतलाय घटस्फोट; पाहा फोटो
जाणून घ्या क्रिकेटच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जे दोनदा लग्नबंधनात अडकले.
Web Title: Photos these legendary cricketers have been married twice and some have got divorced arg 02