-
सचिन तेंडुलकर भारत आणि इंग्लंड यांच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर उपस्थित होता.
-
सचिन तेंडुलकरने लॉर्ड्सच्या मैदानावर घंटानाद केल्यानंतर सामन्याला सुरूवात करण्यात आली. कसोटी सामना सुरू करण्यापूर्वी घंटानाद करण्याची ही परंपरा आहे.
-
लॉर्ड्सचं क्रिकेट मैदान हे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि या मैदानाच्या संग्रहालयात सचिन तेंडुलकरचं नवं छायाचित्र लावण्यात आलं आहे.
-
सचिन तेंडुलकरने स्वत: या छायाचित्राचं उद्घाटन केलं आहे.
-
सचिन तेंडुकरसह उद्घाटनावेळी MCC चे चेयरमन मार्क निकोलसही उपस्थित होते.
-
सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण लॉर्ड्सच्या मैदानावर सचिनचं शतक नाहीये, भले सचिनचं नाव लॉर्ड्सच्या ऑनरबोर्डवर नाही, पण आता त्याचं छायाचित्र संग्रहालयात कायम असणार आहे.
-
सचिन तेंडुलकरचं हे छायाचित्र भारताच्या कसोटी जर्सीमधील आहे.
-
सचिन तेंडुलकरने त्याचे छायाचित्र लॉर्ड्सच्या संग्रहालयात लावण्यात आल्याबद्दल त्याच्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
-
सचिन तेंडुलकरने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मी पहिल्यांदा १९९८ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर आलो होतो आणि नंतर १९८९ मध्ये स्टार क्रिकेट क्लब संघासह या मैदानावर आलो. या संघाबरोबरचा जुना फोटोही सचिनने शेअर केला आहे.
IND vs ENG: लॉर्ड्समध्ये आता कायम दिसणार ‘क्रिकेटचा देव’, स्वत:चा फोटो पाहून भावूक झाला सचिन तेंडुलकर; पाहा Photo
Sachin Tendulkar Portrait: भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीसाठी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर हजेरी लावली होती. लॉर्ड्सच्या संग्रहालयात सचिन तेंडुलकरचे छायाचित्र लावण्यात आले आहे.
Web Title: Sachin tendulkar special portrait unveiled in lords mcc museum master blaster shares post see photos bdg