-
ICC Women’s Cricket World Cup: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला मंगळवारपासून (३० सप्टेंबर) सुरूवात झाली आहे.
-
या स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश (Pakistan vs Bangladesh, Women’s ODI World Cup 2025) हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.
-
या सामन्यात समालोचन करत असलेल्या पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीरने (Former Pakistan Women’s Cricket Team Sana Mir) वादग्रस्त वक्तव्य केले.
-
Sana Mir Azad Kashmir Controversy: समालोचन करत असताना पाकिस्तानची फलंदाज नतालिया परवेजबद्दल बोलताना तिने ‘आझाद काश्मीर’चा (Azaad Kashmir) उल्लेख केला.
-
आशिया चषक २०२५ (Asia Cup 2025) स्पर्धेत भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये बरंच काही घडले होते.
-
भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंबरोबर हात मिळवण्यास नकार दिला होता.
-
भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ (Pakistani Cricketers Haris Rauf and Sahibzada Farhan) यांनी आक्षेपार्ह हावभाव केले होते.
-
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर फरहानने बंदुकीने सेलिब्रेशन केले होते.
-
हरिस रौफने विमान क्रॅश झाल्याचे सातत्याने हावभाव केले.
-
यावर भारतीय खेळाडूंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
Sana Mir Controversy: भारताचा सूर्या ते पाकिस्तानची सना मीर… भारत-पाकिस्तान सामन्यावरून चर्चेत आलेली ५ विधानं
Sana Mir Controversial Comment During Women’s World Cup 2025: पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यात समालोचन करत असलेल्या पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीरने वादग्रस्त वक्तव्य केले.
Web Title: Icc women cricket world cup sana mir pakistan controversy haris rauf and sahibzada farhan photos sdn