• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. top 10 indian mobile companies list 2020 scsg

‘मेड इन चायना’ मोबाइलला पर्याय देण्यासाठी ‘या’ १० भारतीय कंपन्यांनी कसली कंबर

तुम्हाला यापैकी अनेक कंपन्या भारतीय आहेत हे ही ठाऊक नसेल; एकदा ही गॅलरी पाहाच

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • मागील दहा वर्षांपासून भारतीय स्मार्टफोन मार्केटसंदर्भात जगभरामध्ये चर्चा आहे. दहा वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. या काळात स्मार्टफोन बाजारपेठेने अनेक चढ उतार पाहिले आहेत. एकेकाळी जागतिक बाजारपेठेप्रमाणेच भारतामध्येही नोकियाचा दबदबा होता. मात्र त्यानंतर इतर अनेक परदेशी स्मार्टफोन कंपन्यांनी ही बाजारपेठ काबीज केली. खास करुन चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर स्वस्त किंमती, जास्त फिचर्स आणि आकर्षक ऑफर्सच्या जोरावर चांगलीच पकड मिळवली आहे. मात्र सध्या सुरु असणाऱ्या भारत चीन तणावामुळे अनेकांनी चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. चीनविरोधात भारतीयांमध्ये असलेला संताप आणि एकंदरित स्मार्टफोन बाजारपेठेवर पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय स्मार्टफोन कंपन्या लवकरच मोठ्या घोषणा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या शर्यतीमध्ये नक्की किती कंपन्या आहेत हे अनेकांना ठाऊक नाही. आपण याच कंपन्यांबद्दल या फोटोगॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात कोण कोणत्या भारतीय कंपन्या बनवतात स्मार्टफोन आणि फिचरफोन...
    1/21

    मागील दहा वर्षांपासून भारतीय स्मार्टफोन मार्केटसंदर्भात जगभरामध्ये चर्चा आहे. दहा वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. या काळात स्मार्टफोन बाजारपेठेने अनेक चढ उतार पाहिले आहेत. एकेकाळी जागतिक बाजारपेठेप्रमाणेच भारतामध्येही नोकियाचा दबदबा होता. मात्र त्यानंतर इतर अनेक परदेशी स्मार्टफोन कंपन्यांनी ही बाजारपेठ काबीज केली. खास करुन चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर स्वस्त किंमती, जास्त फिचर्स आणि आकर्षक ऑफर्सच्या जोरावर चांगलीच पकड मिळवली आहे. मात्र सध्या सुरु असणाऱ्या भारत चीन तणावामुळे अनेकांनी चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. चीनविरोधात भारतीयांमध्ये असलेला संताप आणि एकंदरित स्मार्टफोन बाजारपेठेवर पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय स्मार्टफोन कंपन्या लवकरच मोठ्या घोषणा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या शर्यतीमध्ये नक्की किती कंपन्या आहेत हे अनेकांना ठाऊक नाही. आपण याच कंपन्यांबद्दल या फोटोगॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात कोण कोणत्या भारतीय कंपन्या बनवतात स्मार्टफोन आणि फिचरफोन…

  • 2/21

    मायक्रोमॅक्स: भारतीय स्मार्टफोन कंपनी म्हटल्यावर डोक्यात सर्वात आधी येणारे नाव म्हणजे मायक्रोमॅक्स. सन २००० साली मायक्रोमॅक्स कंपनीने स्मार्टफोन उद्योगामध्ये पहिले पाऊल टाकले.

  • 3/21

    मायक्रोमॅक्स कंपनीचे मुख्यालय गुडगावमध्ये आहे. कंपनीचे अगदी फिचर फोनपासून ते स्मार्टफोनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे फोन बाजारात उपलब्ध आहेत. सध्या परदेशी बाजारपेठांचे वर्चस्व असणाऱ्या भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये हीच सर्वात मोठी भारतीय कंपनी आहे. लवकरच मायक्रोमॅक्स तीन स्मार्टफोनची घोषणा करु शकते असं सांगण्यात येत आहेत.

  • 4/21

    कार्बन: ही मोबाइल कंपनीही भारतीय स्मार्टफोन कंपन्यांपैकी दुसरी महत्वाची कंपनी. या कंपनीची स्थापना २००९ साली झाली होती. या कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्लीमध्ये आहे.

  • 5/21

    कार्बन मोबाइलला भारताबरोबरच बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि मध्य पूर्व युरोपमधील स्मार्टफोन बाजारपेठांमध्ये चांगली मागणी आहे. या कंपनीने फोन हे खास करुन मीड रेंजमध्ये म्हणजेच जास्त महागही नाहीत आणि स्वस्तही नाहीत अशाप्रकारचे आहेत.

  • 6/21

    इनटेक्स: अनेकांना ठाऊक नसेल मात्र इनटेक्स ही स्मार्टफोन कंपनीही भारतीयच आहे. या कंपनीची स्थापना १९९६ साली झाली. सुरुवातील साधे फिचर फोन बनवणाऱ्या कंपनीने काळाप्रमाणे कात टाकली आणि त्यांनी फिचर फोनबरोबरच स्मार्टफोन निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकलं. फरहान अख्तर या कंपनीचा ब्रँड अँबेसेडर होता.

  • 7/21

    इनटेक्स मोबाइल कंपनीचे मुख्य कर्यालय नवी दिल्लीमध्ये आहेत. ही कंपनी मोबाइलबरोबर इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही बनवते. या कंपनीचे फिचर फोन्स लोकप्रिय आहेत.

  • 8/21

    सेल्कॉन: या भारतीय कंपनीची स्थापना २००९ साली झाली असून कंपनीचे मुख्य कार्यालय हैदराबादमध्ये आहे. कॅम्पस आणि मिलीनीया या दोन नावाने कंपनी स्मार्टफोन विकते.

  • 9/21

    सेल्कॉनचे फोन सुरुवातील तैवान आणि चीनमध्ये असेंम्बल केले जायचे. मात्र त्यानंतर कंपनीने हैदराबाद आणि तिरुपती येथील प्लॅटमधून मोबाइल निर्मिती करण्यास सुरुवात केली. कंपनीचे एकूण तीन प्लॅट असून दोन हैदराबादमध्ये आहेत.

  • 10/21

    सेरो: ही सुद्धा एक भारतीय मोबाइल कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २०१३ साली झाली आहे. कंपनीचे मुख्यालय बेंगळुरुमध्ये आहे. स्मार्टफोन, ऑप्रेटींग सिस्टीम, वायरलेस एचडीएम आणि स्ट्रीमींग उपकरणे या क्षेत्रामध्ये की कंपनी काम करते.

  • 11/21

    २०१६ साली सेरो कंपनीने मार्क वन हा फोन बाजारात आणला होता. या फोनमध्ये २१ मेगापिक्सल कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा, ३२ जीबी स्टोरेज, १२८ जीबीपर्यंत एक्सपांडेबल स्टोरेज असे फिचर होते.

  • 12/21

    आय बॉल: कंप्युटर क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणारी आय बॉल ही भारतीय कंपनी आहे हे अनेकांना ठाऊक नसेल. आयबॉलची स्थपना २००१ साली झाली असून कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

  • 13/21

    आय बॉल ही कंपनी माऊस, की पॅड, सीपीयू आणि कंप्युटर्सबरोबर स्मार्टफोनही बनवते. कंपनीचे इंटेल आणि मायक्रोसॉफ्टबरोबर करार असून त्यांच्या मदतीने कंपनी स्मार्टफोन बाजारात आणते.

  • 14/21

    लावा मोबाइल्स: भारतीय स्मार्टफोन म्हटल्यावर अजून एक आवर्जून आठवणारं नाव म्हणजे लावा मोबाइल्स. २००९ मध्ये लावा मोबाइल्स कंपनीची स्थापना झाली. या कंपनीचे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे आहे.

  • 15/21

    लावा कंपनीच्या फोनला भारताबरोबरच थायलंड, नेपाळ, बंगलादेश आणि मॅक्सिकोसारख्या देशांमध्ये चांगली मागणी आहे. या कंपनीकडे फिचर फोनबरोबरच स्मार्टफोन्सचीही मोठी रेंज उपलब्ध आहे. सुरुवातीच्या काळात भारतीय संघचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या कंपनीच्या जाहिराती केल्या आहेत.

  • 16/21

    स्पाइस फोन: या भारतीय कंपनीची स्थापना २००० साली झाली. या कंपनीचे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये आहे.

  • 17/21

    स्पाइस फोन या कंपनीचे फिचर फोन्स आणि स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणात फोन्सची निर्मिती करत नाही.

  • 18/21

    झोलो: ही सुद्धा भारतीय स्मार्टफोन कंपनी आहे. भारतात पहिल्यांदा याच कंपनीने इंटेल प्रोसेसरचा वापर करुन फोन बाजारात आणला होता. ही कंपनी लावा कंपनीच्या मालकीचीच आहे. झोलोची स्थापना २०१२ साली झाली.

  • 19/21

    देशात फोर जी नेटवर्कला सपोर्ट करणारे स्मार्टफोन आणणाऱ्या काही पहिल्या कंपन्यांमध्ये झोलोचा समावेश होतो. तसेच पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेमध्ये ड्युएल कॅमेरा आणणारी कंपनीही झोलोच आहे. या कंपनीचे मुख्यालय उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे आहे.

  • 20/21

    रिलायन्स लाइफ (एलव्हायएफ): ही सुध्दा स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

  • 21/21

    २०१५ साली सुरु झालेली रिलायन्स लाइफ (एलव्हायएफ) ही कंपनी रिलायन्ससाठी आणि जियोसाठी उत्पादने बनवते. या कंपनीचे अर्थ, फ्लेम, वॉटर आणि विंड नावाचे मोबाइल लॉन्च केले आहेत. अंबानींच्या मालकीची ही कंपनी स्मार्टफोन क्षेत्रामध्ये फारशी दिसत नसली तरी ही देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

Web Title: Top 10 indian mobile companies list 2020 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.