• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. cyber security 16 most important tips for your smartphone mobile users scsg

सायबर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मोबाइल हाताळताना ‘या’ १६ गोष्टींची काळजी घ्याच

स्मार्टफोन सुरक्षेसंदर्भातील प्राथमिक गोष्टींबद्दल जाणून घ्या

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • भारत आणि चीन संबंध कमालीचे तणावपूर्ण झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून सायबर हल्ल्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनेही यासंदर्भातील इशारा जारी केला आहे. मात्र सायबर हल्ला हा कायम प्लॅपटॉप किंवा कंप्युटरच्या माध्मयातून केला जातो असं नव्हते. आजच्या स्मार्ट युगामध्ये आपल्या प्रत्येकाच्या तळतावर असणारी पाच इंचाची मोबाइल स्क्रीनही तुम्हाला आर्थिक गंडा घालण्यासाठी, तुमची माहिती चोरण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळेच मोबाइलवरुन आर्थिक व्यवहार करताना आणि माहिती शेअर करताना काळजी घेणे तुमच्यासाठी आणि तुमच्या ओळखीतील कॉन्टॅक्टसाठी फायद्याचे आहे. आता मोबाइल वापरताना काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. याच प्रश्नांची अगदी सोप्या शब्दात आणि १६ महत्वाच्या टीप्स देत उत्तरे देण्याचा प्रयत्न या फोटोगॅलरीच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान श्रेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल जोशी या तरुणाने दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात अगदी साध्या सोप्या टीप्स ज्यामुळे तुमचा मोबाइल वापर अधिक सुरक्षित होईल... (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)
    1/17

    भारत आणि चीन संबंध कमालीचे तणावपूर्ण झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून सायबर हल्ल्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनेही यासंदर्भातील इशारा जारी केला आहे. मात्र सायबर हल्ला हा कायम प्लॅपटॉप किंवा कंप्युटरच्या माध्मयातून केला जातो असं नव्हते. आजच्या स्मार्ट युगामध्ये आपल्या प्रत्येकाच्या तळतावर असणारी पाच इंचाची मोबाइल स्क्रीनही तुम्हाला आर्थिक गंडा घालण्यासाठी, तुमची माहिती चोरण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळेच मोबाइलवरुन आर्थिक व्यवहार करताना आणि माहिती शेअर करताना काळजी घेणे तुमच्यासाठी आणि तुमच्या ओळखीतील कॉन्टॅक्टसाठी फायद्याचे आहे. आता मोबाइल वापरताना काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. याच प्रश्नांची अगदी सोप्या शब्दात आणि १६ महत्वाच्या टीप्स देत उत्तरे देण्याचा प्रयत्न या फोटोगॅलरीच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान श्रेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल जोशी या तरुणाने दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात अगदी साध्या सोप्या टीप्स ज्यामुळे तुमचा मोबाइल वापर अधिक सुरक्षित होईल… (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)

  • 2/17

    १. शक्यतो ऑफिशिअल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोर वरूनच ऍप्स डाउनलोड करावीत. जर बाहेरून एखाद्या लिंक वरून अप्लिकेशन डाउनलोड करायचे असल्यास त्या लिंक बद्दल आपल्याला पूर्णतः खात्री असणे आवश्यक आहे.

  • 3/17

    २. आपल्या फोन मध्ये कोणत्याही प्रकारच्या अँटीव्हायरस किंवा मेमरी क्लिनिंग, बॅटरी सेव्हर अप्लिकेशनची गरज नाही सध्या ऑपरेटिंग सिस्टीम ह्याच सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असल्यामुळे प्राथमिक स्वरूपाची काळजी सिस्टीमद्वारे आपोआपच घेतली जाते.

  • 4/17

    ३. फेक अप्लिकेशन पासून सावध राहावे, कोणतेही अप्लिकेशन डाउनलोड करतांना त्याचे डिस्क्रिप्शन आणि अधिकृत रिव्ह्यूज वाचूनच ते वापरावे.

  • 5/17

    ४. आवश्यकता नसल्यास कोणतेही स्क्रीन शेअरिंग अप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये. बहुतांश पेयमेन्ट फ्रॉड हे ह्याच अप्लिकेशनच्या साहाय्याने केले जातात. ह्या अप्लिकेशन द्वारे तिऱ्हाईत व्यक्ती आपल्या फोनला इंटरनेटच्या माध्यमातून हाताळू शकतो.

  • 6/17

    ५. कोणत्याही प्रकारचा ओटीपी हा शेअर केला जाऊन नये, सध्याच्या डिजिटल युगात ओटीपी ला अनन्यसाधारण महत्व आहे. कोणतीही आस्थापना किंवा प्रणाली आपला ओटीपी शेअर करण्यास सांगत नाही त्यामुळे आपल्याकडे कोणी ओटीपीची मागणी करत असल्यास ती करू नये.

  • 7/17

    ६. के वाय सी फ्रॉडपासून सावध राहावे. सध्या लोकडाऊन च्या काळात पुष्कळशा गोष्टी जसे कि इंश्युरन्स रिन्युवल, पैसे पाठवणे, मेडिक्लेम ह्या ऑनलाईन पेमेंटद्वारे केल्या जात आहेत, ह्याबाबतचे मेसेजेस आपल्याला अधिकृत कंपनीज कडून पाठवले गेले तरी मेसेज मधील लिंक ही खात्री केल्याशिवाय ओपन करू नये.

  • 8/17

    ७. कोणत्याही लिंकची सत्यता आधी अधिकृत असल्याची खात्री केल्याशिवाय त्यावर व्यक्तिगत माहिती देऊ नये. नुकतंच महा सायबर द्वारे काही लाख यूजर्स चा डेटा हा बनावट नोकरी पोर्टल द्वारे चोरी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे अशा बनावट लिंक पासून सावध राहणे गरजेचे आहे.

  • 9/17

    ८. माहितगार व्यक्तीकडून किंवा संस्था अथवा आस्थापनांकडून आलेले ईमेल उघडावे. हल्ली प्रसिद्ध असणाऱ्या काही आस्थापनांच्या नावे बनावट ईमेल पाठवून फ्रॉड केले जातात, त्यामुळे खात्री केल्याशिवाय कोणताही ईमेल उघडू नये किंवा अटॅचमेंट डाउनलोड करू नये.

  • 10/17

    ९. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करतांना जर कोणतीही शंका आल्यास अधिकृत व्यक्तींशी संपर्क साधून प्रक्रिया समजून घ्यावी व नंतरच आपले व्यवहार करावेत.

  • 11/17

    १०. ऑनलाईन शॉपिंग करतांना भरघोस सूट आहे म्हणून अपरिचित वेबसाईट वरून वस्तू खरेदी करू नयेत आणि आपल्याला पूर्ण आत्मविश्वास नसल्यास शक्यतो ऑनलाईन पेमेंट न करता कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा.

  • 12/17

    ११. ऑनलाईन पेमेंट हे https:// असणाऱ्या साईट्स वरूनच करावे.

  • 13/17

    १२. कोणताही पासवर्ड सेट करतांना त्यात व्यक्तिगत माहिती जसे की जन्मदिनांक, नाव, आडनाव ह्या गोष्टी ठेवणे टाळावे, त्याऐवजी अक्षर, अंक आणि चिन्ह ह्या सहित १०-१५ कॅरॅक्टरचा पासवर्ड ठेवावा तसेच पिन सेट करतांनाही जे आकडे निवडाल त्यात स्वतःचे वय, जन्मतारीख ह्याचा उल्लेख टाळावा.

  • 14/17

    १३. आपल्या ब्राऊजरवर शक्यतो पासवर्ड सेव्ह करून ठेऊ नयेत.

  • 15/17

    १४. गरज नसल्यास आपल्या फोन च्या लोकेशन पर्यायाला बंद करून ठेवावे, बहुतांश अप्लिकेशन साठी लोकेशन ऍक्सेसची गरज असते, त्या अप्लिकेशनचा वा पर करून झाला की लोकेशन ऍक्सेस पर्याय सेटिंग्स मधून बंद (ऑफ) करून ठेवावा.

  • 16/17

    १५. शक्यतो पायरेटेड कन्टेन्टपासून दूर राहावे, कारण बहुतांश पायरसी करणाऱ्या वेबसाईट्सवर अनावश्यक जाहिराती किंवा आपल्या फोन ला हानिकारक असणारे मालवेअर फोनमध्ये नुकसान पोहोचवू शकतात.

  • 17/17

    १६. आपल्या फोन मध्ये असणारी अनावश्यक अप्लिकेशन काढून टाकावीत, बहुतांश स्मार्टफोन कंपन्या ह्या झालेल्या करारा नुसार विविध अप्लिकेशन सुरुवातीपासूनच फोन मध्ये इन्स्टॉल करून देतात, त्यातील काही अप्लिकेशन आपल्याला काढता येत नाहीत ज्याला तांत्रिक भाषेत ब्लॉटवेअर म्हणतात.

Web Title: Cyber security 16 most important tips for your smartphone mobile users scsg

IndianExpress
  • Surge pricing: Govt allows cab aggregators to charge 2X base fare during peak hours
  • ‘Deal with much less tariffs’: Trump on India-US trade agreement
  • Former Bangladesh PM Sheikh Hasina sentenced to 6 months in prison by ICT: Report
  • How BJP has scored own goal over Hindi vs Marathi row, galvanised Thackerays
  • IND vs ENG LIVE Cricket Score, 2nd Test Day 1: England win toss and opt to bowl first against India in Edgbaston
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.