• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. top 10 tips how to identify fake apps in the google play store and app store scsg

App खरं की खोटं?; कसं ओळखाल जाणून घ्या १० टीप्स

Smart Phone साठी दहा Smart Tips

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • आज आपल्यापैकी अनेकजण मोबाइल वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स वापरतो. मागील महिन्यामध्ये सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्लिकेशनवर बंदी घातल्यानंतर अनेकांनी या अ‍ॅप्लिकेशनच्या एपीके फाइल्स डाउनलोड करुन अ‍ॅप डाउलनोड केले. तर अनेकांनी कोणते अ‍ॅप डाऊनलोड करावे, कोणते अ‍ॅप खरे कोणते खोटे, हेच अनेकदा कळत नाही. त्यामुळेच आपण या फोटोगॅलरीच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारा स्वप्निल जोशी हा तरुण आपल्याला सांगणार आहे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताना कोणती आणि काय काळजी घ्यावी याबद्दल. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)
    1/11

    आज आपल्यापैकी अनेकजण मोबाइल वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स वापरतो. मागील महिन्यामध्ये सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्लिकेशनवर बंदी घातल्यानंतर अनेकांनी या अ‍ॅप्लिकेशनच्या एपीके फाइल्स डाउनलोड करुन अ‍ॅप डाउलनोड केले. तर अनेकांनी कोणते अ‍ॅप डाऊनलोड करावे, कोणते अ‍ॅप खरे कोणते खोटे, हेच अनेकदा कळत नाही. त्यामुळेच आपण या फोटोगॅलरीच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारा स्वप्निल जोशी हा तरुण आपल्याला सांगणार आहे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताना कोणती आणि काय काळजी घ्यावी याबद्दल. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)

  • 2/11

    १. जे अ‍ॅप्लिकेशन आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करणार आहेत त्याबद्दल आधी थोडी माहिती घ्यावी. त्याचे फीचर्स आपल्या ओळखीत कोणी वापरकर्ते असतील तर समजून घ्यावे, आणि ते अधिकृत प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर वरूनच डाउनलोड करावे.

  • 3/11

    २. अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताना ते गुगल सर्च केल्यावर सगळ्यात वरती ज्या कंपनीची लिंक असते त्यावर क्लिक केल्यावर त्या कंपनीची इतर अ‍ॅप्लिकेशन्ससुद्धा आपल्याला दिसतात. यावरून कंपनीची सत्यता ढोबळमानाने पडताळता येईल. किंवा आपण तिचे नाव जर सर्च इंजिन वर सर्च केले तर त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळेल.

  • 4/11

  • 5/11

    ४. जर आर्थिक व्यवहारासंबंधित अ‍ॅप्लिकेशन असेल तर त्यावर डेव्हलपरचे नाव नसून एखाद्या प्रसिद्ध कंपनीचे किंवा बँकेचेच नाव असते. किंवा बँकेची वेबसाईटसुद्धा असते. आपल्याला खात्री करून घेण्यासाठी वेबसाईटला भेट देऊन पाहावी. तिथेही आपल्याला अ‍ॅपच्या लिंक दिलेल्या असतात.

  • 6/11

    ५. आपल्या आधी एखादे अ‍ॅप्लिकेशनला किती जणांनी डाउनलोड केले आहे, ते डाउनलोड काउंट्समध्ये तपासून पहा म्हणजे आपण योग्य तेच अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करीत आहोत ह्याची खात्री होते. बरेचदा काही प्रसिद्ध अ‍ॅप्लिकेशनची बनावट अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध असतात ज्याने फसगत होऊ शकते.

  • 7/11

    ६. अ‍ॅप्लिकेशनचे रिव्ह्यूज आणि स्टार रेटिंग नक्की तपासा,. त्यात सर्वात जास्त रेटिंग दिलेले आणि सर्वात कमी रेटिंग दिलेले असे दोन्ही रिहव्युज पहावे.

  • 8/11

    ७. अ‍ॅप्लिकेशनच्या पर्मिशन्स म्हणजेच परवानग्यांसंदर्भातील माहिती वाचून घ्या. अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर आपण आपल्या फोनमधील कोणकोणत्या गोष्टी जसे कॉन्टॅक्ट्स, कॅमेरा आणि इतर गोष्टी वापरण्याच्या पर्मिशन्स दिल्या आहेत हे ठाऊक असणं गरजेचं आहे.

  • 9/11

    ८. अ‍ॅप्लिकेशनची रिलीज डेट तपासून पहा. बरेचदा ग्रँड लॉन्च वगैरे घोषणा करून जुनेच फ्लॉप अ‍ॅप्लिकेशन प्रसिद्ध केले जातात. त्यासाठी आधीच्या व्हर्जनमध्ये नक्की काय समस्या होत्या ते जाणून घेणे आवश्यक असते. रिलीज डेट आपल्याला प्ले स्टोर किंवा अ‍ॅप स्टोरवर सहज पाहायला मिळू शकते.

  • 10/11

    ९. बहुतांश प्रसिद्ध अ‍ॅप्लिकेशनच्या नावाच्या खाली, एडिटर्स चॉईस, टॉप डेव्हेलपर या आशयाचे शब्द असतात. हे शब्द ती अ‍ॅप्लिकेशन अधिकृत असल्याचा एक पुरावाच असतो असं म्हणता येईल. त्यामुळे एखाद्या प्रसिद्ध अ‍ॅप्लिकेशनच्या पेजवर आपल्याला असे काही दिसले नाही तर आपण बनावट अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करत नाही ना ह्याची पुन्हा एकदा खात्री करून पाहावी.

  • 11/11

    १०. आपण अ‍ॅप्लिकेशनचा किती वापर करणार आहोत आणि त्याची आपल्याला खरच गरज आहे का हे तपासून पहा. समजा आपण फार क्वचितच त्या अ‍ॅप्लिकेशनवरील सेवा/सुविधा वापरणार असाल तर शक्यतो अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल न करता त्यांच्या वेबसाईट लिंक वरूनच त्या सेवा/सुविधा वापरण्याला प्राधान्य द्या.

Web Title: Top 10 tips how to identify fake apps in the google play store and app store scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.