-
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज जिओ ग्लास सेवेची घोषणा करण्यात आली.
-
जिओ ग्लास ही थ्रीडी इंटरॅक्शन सेवा असणार असून यामध्ये संवाद साधणाऱ्या व्यक्तीची हॉलोग्राम प्रतिकृती पाहता येणार आहे. प्रमुख्याने डिजीटल शिक्षणाचे ध्येय समोर ठेऊन जिओ ग्लास लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.
-
"जिओ ग्लासमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना व्ह्यर्चूअल थ्रीडी क्लास रुमच्या माध्यमातून संवाद साधता येईल, असं मत या सेवेची घोषणा करताना रिलायन्सच्या किरण थॉमस यांनी सांगितलं.
-
जिओने रिअॅलिटी क्लाउडचे तंत्रज्ञान वापरुन रियल टाइम टेलिकास्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे, असंही थॉमस म्हणाले.
-
"पुस्तकातून भूगोल शिकणं इतिहास जमा होणार असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव हॉलोग्रामच्या माध्यमातून घेता येईल," असं थॉमस म्हणाले.
-
थ्रीडी तंत्रज्ञान सर्वसामान्यांना वापरता येण्याच्या दृष्टीने जीओ ग्लासची सेवा बाजारात आणण्यात आली आहे. सध्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेमध्ये हॉलोग्राम संवादाची म्हणजेच समोर संवाद साधणाऱ्या व्यक्तीची डिजीटल प्रतिमा पाहता येणार असून संवाद अधिक खराखुरा वाटण्यास मदत होणार आहे.
-
जिओ ग्लास अॅव्हिएटर्सचे वजन हे ७५ ग्राम असणार आहे. यामध्ये पर्सनलाइज ऑडिओची सुविधा देण्यात आली आहे. जिओ ग्लासचं तंत्रज्ञान फाइव्ह जीला सपोर्ट करणारं आहे.
-
जिओ ग्लास हे वायरच्या माध्यमातून मोबाइलशी कनेक्ट करुन डेटा ड्रान्सफर करता येणार आहे.
-
सध्या जिओ ग्लास हे २५ अॅप्लिकेशनला सपोर्ट करते असंही कंपनीने सांगितलं आहे.
-
डेटा ट्रान्सफरच्या पर्यायामुळे या ट्रान्सफरच्या सोयीमुळे वेगवेगळ्या कारणांसाठी जिओ ग्लास वापरता येईल असं कंपनीचं म्हणणं आहे. जिओ ग्लासमध्ये टू डी व्हिडिओ कॉलचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
-
जिओ ग्लासेसचे वितरण ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार आहे. या ग्लासेसची किंमत अंदाजे २०० डॉलर म्हणजेच १४ हजारांच्या आसपास असणार आहे.
Jio Glass : जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि कधीपासून होणार उपलब्ध
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली जिओ ग्लासची घोषणा
Web Title: Jio glass price specs and release date revealed details here scsg