-
गुगल हे फक्त सर्च इंजिन नसून याद्वारे अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. गुगलमध्ये अनेक रंजक गोष्टी लपल्या आहेत. तर चला मग जाणून घेऊया गुगल मध्ये कोणत्या रंजक गोष्टी लपल्या आहेत.
-
१) बॅरल रोल… गुगलच्या होमपेजवर गेल्यावर सर्च बॉक्समध्ये "Do barrel roll" टाईप करून एन्टर केल्यावर तुमची स्क्रीन वर्तुळाकार फिरेल.
-
२) द अटरी ब्रेकआऊट गेम खूप कंटाळा आला असेल तर गुगलवर तुम्ही 'द अटरी ब्रेकआऊट गेम' खेळू शकता. गुगलच्या होमपेजवर गेल्यावर सर्च बॉक्समध्ये 'the atari breakout game' टाईप करून एन्टर केल्यावर पहिली इमेज येईल त्यावर क्लिक केल्यावर गेम सुरु होतो.
-
३) गुगल स्पिअर गुगलच्या होमपेजवर गेल्यावर सर्च बॉक्समध्ये 'Google sphere' टाईप करून एन्टर न करता खाली दिलेल्या 'i am feeling lucky' वर क्लिक केल्यावर तुमची संपूर्ण स्क्रीन गोलाकार बनेल.
-
४) फ्लिप कॉइन तुम्हाला जर टॉस करायचा असेल तर गुगलच्या 'फ्लिप कॉइन ट्रिक'चा वापर करू शकतो. त्यासाठी गुगलच्या होमपेजवर गेल्यावर त्या ठिकाणी दिलेल्या माईकवर क्लिक करून 'फ्लिप कॉइन' असं बोलावं.
-
५) गुगल ग्रॅव्हिटी गुगलच्या होमपेजवर गेल्यावर सर्च बॉक्समध्ये 'Google Gravity' टाईप करून एन्टर न करता खाली दिलेल्या 'i am feeling lucky' वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनचा भाग तुकडे होऊन खाली पडताना दिसतो.
-
६) फक्त चेहरा 'face' या टूल चा वापर करून अभिनेते किंवा अभिनेत्रींच्या फोटोमधील फक्त चेहरे तुम्हाला पहावयाचे असल्यास तुम्ही पाहू शकता.
-
७) मेलीझा यामध्ये तुम्हाला एलिअन सोबत गप्पा मारू शकता. (म्हणजे तुम्हाला तसं भासवलं जातं) Google Earth 5 चा वापर करून तुम्ही हे करू शकता. होमपेजवर गेल्यावर सर्च बॉक्समध्ये 'Meliza' टाईप करून एन्टर करा.
-
८) टायमर सेट करा या वैशिट्याचा वापर करून तुम्ही टायमर सेट करू शकता. त्यासाठी सर्च बॉक्समध्ये 'set timer for 10 min' टाईप करा आणि जादू पहा.
-
९) लहान मुलांना प्राण्यांचे आवाज ऐकवा… सर्च बॉक्समध्ये 'cat noises' असं टाईप करून एन्टर करा. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकू शकता.
-
१०) प्ले पॅक मॅन पॅक मॅन गेम खेळण्यासाठी सर्च बॉक्समध्ये 'pac man' टाईप करून एन्टर करा. तुम्हाला हा मनोरंजक खेळ खेळता येईल.
बापरे! अॅमेझॉनच्या जंगलात दिसला महाकाय अॅनाकोंडा; हत्तीलाही गिळू शकतो एवढा मोठा साप, VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली