• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. maximum phonepe payment done through chinese mobiles scsg

चिनी फोनवरुन PhonePe वापरणाऱ्या भारतीयांची संख्या पाहून थक्क व्हाल; टॉप पाच पैकी चार कंपन्या चिनी

या अहवालावरुन वधारत्या डिजिटल देयक व्यवहारांचे भारवाही चिनी स्मार्टफोनच असल्याचं दिसून येत आहे.

October 27, 2021 14:15 IST
Follow Us
  • maximum phonepe payment done through Chinese mobiles
    1/15

    भारतात वेगाने फोफावत असलेल्या डिजिटल उलाढालींसाठी वापरल्या जाणाऱ्या अव्वल पाचपैकी चार स्मार्टफोनच्या मुळाशी चिनी कंपन्या आहेत.

  • 2/15

    सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत झालेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये तब्बल ४५ टक्के व्यवहार हे शाओमी आणि विवो या दोन फोनच्या वापरातून पार पडले आहेत.

  • 3/15

    वॉलमार्टचे पाठबळ असलेल्या ‘फोनपे’ या ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस – यूपीआय’ व्यवहारांसाठी सर्वाधिक वापरात येणाऱ्या मोबाइल उपयोजनाच्या (अ‍ॅप) तिमाही ‘पल्स’ अहवालाने हे निष्कर्ष नोंदविले आहेत.

  • 4/15

    फोनपेचे तब्बल ३.२८ कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.

  • 5/15

    देशभरातील ७२६ जिल्ह्यांपैकी ७२० जिल्ह्यांमधील ग्राहकांकडून होणाऱ्या जवळपास ४५ टक्के यूपीआय व्यवहारांची प्रक्रिया फोनपे अ‍ॅपद्वारे केली जाते.

  • 6/15

    शाओमीचा फोन वापरणारे ८ कोटी ग्राहक हे फोनपे अ‍ॅपचा वापर करत आहेत.

  • 7/15

    तर विवो फोनधारकांमध्ये हे प्रमाण ६.५ कोटी इतके असल्याचं समोर आलं आहे.

  • 8/15

    त्या खालोखाल दक्षिण कोरियाच्या सॅमसंग फोनच्या वापरकर्ते येतात आणि त्यांची संख्या ६.१० कोटी इतकी आहे, असे फोनपे अ‍ॅपद्वारे प्रसिद्ध माहिती सांगते.

  • 9/15

    चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील ओप्पो आणि रिअलमी फोनच्या वापरकर्त्यांचे प्रमाण अनुक्रमे ४.२ कोटी आणि २.४ कोटी असे आहे.

  • 10/15

    या अव्वल पाचांपैकी सॅमसंग वगळल्यास अन्य सर्व फोनच्या नाममुद्रांचे मूळ चिनी आहे.

  • 11/15

    ‘फोनपे पल्स’ अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर २०२१ तिमाहीत भारतातील डिजिटल देयक व्यवहारांत लक्षणीय वाढ दिसून आली.

  • 12/15

    या तिमाहीत प्रक्रिया झालेल्या डिजिटल व्यवहारातील देयकांचे एकूण मूल्य आधीच्या तिमाहीच्या तुलनेत २३.३ टक्क्यांनी वाढून ९,२१,६७४ कोटी रुपयांवर गेले.

  • 13/15

    एकूण उलाढालींचे प्रमाणही तिमाहीगणिक ३३.६ टक्क्यांनी वाढून ५२६.५ कोटी उलाढालींपर्यंत वाढले आहे.

  • 14/15

    दुसरी लाट ओसरल्यानंतर, जास्त वेळेसाठी खुली झालेली दुकाने पाहता ऑनलाइन यूपीआय देयक व्यवहारांच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर तिमाहीत ऑफलाइन यूपीआय देयक व्यवहारांचे प्रमाण ६५ टक्क्यांनी वाढल्याचे अहवाल सांगतो.

  • 15/15

    या अहवालावरुन वधारत्या डिजिटल देयक व्यवहारांचे भारवाही चिनी स्मार्टफोनच असल्याचं दिसून येत आहे.

Web Title: Maximum phonepe payment done through chinese mobiles scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.