• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. who is parag agrawal 10 things to know about new twitter ceo scsg

IIT मुंबई ते Twitter CEO व्हाया Microsoft… जाणून घ्या पराग अग्रवाल यांच्याबद्दलच्या १० रंजक गोष्टी

पराग अग्रवाल हे लवकरच ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी होणार आहेत. पण अचानक चर्चेत आलेले पराग नक्की आहेत तरी कोण?

Updated: November 30, 2021 10:17 IST
Follow Us
  • Who Is Parag Agrawal 10 Things To Know About New Twitter CEO
    1/15

    जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि चर्चा घडवून आणणारी वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने सोमवारी मोठ्या खांदेपालटासंदर्भातील घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे.

  • 2/15

    या घोषणेनंतर पराग अग्रवाल यांच्या नावाची सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आहे. पण अचानक चर्चेत आलेले पराग अग्रवाल नक्की आहेत तरी कोण याबद्दल अनेकांना ठाऊक नाहीय. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

  • 3/15

    ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.

  • 4/15

    पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

  • 5/15

    आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग यांनी अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड विद्यापिठामधून कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.

  • 6/15

    त्यानंतर पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्च येथे महत्वाच्या पदांवर काम केलं.

  • 7/15

    पराग २०११ पासून ट्विटर या कंपनीच्या सेवेत आहेत.

  • 8/15

    पराग हे ट्विटरचे पहिली इंजिनियर ठरले ज्यांनी अगदी रेव्हेन्यूपासून कस्टमर इंजिनियरिंगपर्यंतच्या सर्व विभागांमध्ये काम केलं आहे.

  • 9/15

    ट्विटरला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्यात आणि २०१६-२०१७ दरम्यान मोठ्या संख्येने युझर्सला स्वत:कडे आकर्षित करण्यात ट्विटरला जे यश मिळालं त्यात पराग यांचा मोठा वाटा आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.

  • 10/15

    २०१७ मध्ये पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या ‘सीटीओ’पदी नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत.

  • 11/15

    सीटीओ पदी नियुक्त झाल्यापासून पराग यांच्यावर कंपनीची तांत्रिक आघाडी कशी असेल, मशिन लर्निंगचा वापर कसा करता येईल आणि सुधारणांसदर्भातील निर्णयांचे प्रमुख आहेत.

  • २०१९ मध्ये जॅक यांनी पराग यांना प्रोजेक्ट ब्ल्यूस्कायचे प्रमुख पद दिलं. ट्विटरवरील चुकीच्या माहितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ओपन सोर्स पद्धतीने ब्ल्यूस्काय प्रकल्प सुरु करण्यात आलेला.
  • 12/15

    २९ नोव्हेबर २०२१ रोजी पराग कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील असं जाहीर करण्यात आलं.

  • 13/15

    अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्वीट केले. जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

  • 14/15

    जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is parag agrawal 10 things to know about new twitter ceo scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.