-
तुमच्याकडे iPhone 13 असल्यास किंवा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असल्यास, तुम्हाला त्याच्या फिचर्सबद्दल माहित असले पाहिजे. कारण हे फिचर्स इतर उपकरणांपेक्षा वेगळे करते. (Photo- Apple)
-
iPhone 13 मध्ये Reachability फिचर आहे. जे लहान बोटांच्या युजर्संना सहजपणे स्मार्टफोन वापरण्यास मदत करते. या फिचर्सचा वापर करून कोणीही अॅपल आयफोन १३ प्रो मॅक्स ६.७ इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह सहजपणे वापरू शकतो. (Photo- Apple)
-
अॅपलचे ड्रॅग आणि ड्रॉप वैशिष्ट्य Android मधील फिचर्सपेक्षा चांगले आहे. वैशिष्ट्य युजर्संना सहजपणे फोटो किंवा मजकूर एका अॅपवरून दुसऱ्या अॅपवर ड्रॅग करण्यास अनुमती देते. यामुळे खूप वेळ वाचतो. (Photo- Apple)
-
iPhone 13 वरील लाइव्ह टेक्स्ट फीचर फोटोमधून मजकूर काढण्यासाठी ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (OCR) तंत्रज्ञान वापरते. मजकूर मिळवण्यासाठी तुम्ही फक्त इमेज स्कॅन करू शकता आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही अॅपमध्ये पेस्ट करू शकता. तुम्ही मजकूराचे अगदी सहजपणे भाषांतर देखील करू शकता. (Photo- Apple)
-
iPhone 13 चे ग्राहक फोनच्या स्क्रीनवर टॅप न करताही काही फिचर्समध्ये प्रवेश करण्यासाठी बॅक टॅप जेश्चर वापरू शकतात. iPhone 13 द्वारे स्क्रीनशॉट घेऊ शकतात, टॉर्च चालू किंवा बंद करू शकतात आणि स्मार्टफोनच्या मागील बाजूस टॅप करून कॅमेरा उघडू शकतात. (Photo- Apple)
-
iPhone 13 वापरकर्ते नवीन घेतलेले फोटो किंवा व्हिडीओवर फक्त स्वाइप करून फोटो आणि व्हिडीओंमध्ये कॅप्शन जोडू शकतात. कॅमेरा अॅपने घेतलेल्या तुमच्या फोटोंवर डूडल बनवण्यासाठी तुम्हाला दुसरे अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. (Photo- Reuters)
iphone 13: तुमच्याकडे आयफोन १३ आहे का? तर ‘या’ फिचर्सबद्दल जाणून घ्या
तुमच्याकडे iPhone 13 असल्यास किंवा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असल्यास, तुम्हाला त्याच्या फिचर्सबद्दल माहित असले पाहिजे.
Web Title: Do you have an iphone 13 learn about these features rmt