-
मोटोरोलाच्या ६४ जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ५०००mAh बॅटरी दिली जात आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत १३,४९९ रुपये आहे आणि तुम्ही हा फोन ३ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून खरेदी करू शकता.
-
१ मे पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार्या या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनची किंमत फक्त ७, ४९९रुपये आहे आणि तुम्हाला 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले, चांगली बॅटरी लाइफ आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल.
-
पोकोचा हा ५जी स्मार्टफोन ५ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १०,९९९ रुपयांच्या किंमतीत घेतला जाऊ शकतो.
-
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला चांगला प्रोसेसर, बँग डिस्प्ले आणि इतर अनेक फीचर्स दिले जात आहेत.
-
रिअलमीचा हा नवीनतम स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये उपलब्ध केला जाईल आणि त्याची सुरुवातीची किंमत २९,९९९ रुपये असेल. दमदार स्टोरेज आणि अप्रतिम बॅटरीसोबतच यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स देखील दिले जात आहेत. हा फोन ४ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून खरेदी करता येईल.
-
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये, तुम्हाला ६४MP मुख्य सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ६६W टर्बो फ्लॅश चार्जिंग सपोर्ट आणि इतर अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये मिळतील. तसेच हा स्मार्टफोन ४ मे रोजी दुपारी १२ वाजता सेलसाठी उपलब्ध केला जाईल. त्याची किंमत १५ ते २० हजार रुपयांच्या दरम्यान असेल. (all photo: indian express)
भारतीय बाजारपेठेत धमाल करण्यासाठी आले आहेत ‘हे’ ५ स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Web Title: Vivo realme poco motorola poco micromax latest smartphones launched in india flipkart amazon price scsm