• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. 10 best selling smartphones in wrold dpj

Photos: ‘हे’ १० स्मार्टफोन आहेत जगात सर्वाधिक लोकप्रिय; विक्रीतही आहेत अव्वल

जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की जगातील १० सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन कोणते आहेत, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे कारण यामुळे तुमचा फोन खरेदी करण्याच्या अडचणी बर्‍याच प्रमाणात कमी होतील.

June 25, 2022 15:21 IST
Follow Us
  • आजच्या युगात सरासरी अडीच वर्षात लोक आपला स्मार्टफोन बदलतात, त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक असते. याचे एक कारण म्हणजे ट्रेंड. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक लोकप्रियतेनुसार नवीन स्मार्टफोन खरेदी करतात.
    1/12

    आजच्या युगात सरासरी अडीच वर्षात लोक आपला स्मार्टफोन बदलतात, त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक असते. याचे एक कारण म्हणजे ट्रेंड. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक लोकप्रियतेनुसार नवीन स्मार्टफोन खरेदी करतात.

  • 2/12

    .तुम्हालाही सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी सर्वात जास्त विक्री होणारे दहा स्मार्टफोन्स घेऊन आलो आहोत.

  • 3/12

    अ‍ॅपल आयफोन १३ (Apple iPhone 13) ची या वर्षी एप्रिल महिन्यात सर्वाधिक खरेदी झाली. त्याचा व्हॅनिला आयफोन १३ हा फोन सर्वाधिक खरेदी करण्यात आला आहे.

  • 4/12

    अ‍ॅपल आयफोन १३ प्रो मॅक्स (Apple iPhone 13 Pro Max) हा सर्वात शक्तिशाली आणि महागडा स्मार्टफोन आहे जो अ‍ॅपलने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने प्रोसेसरपासून रॅमपर्यंत सर्वच बाबतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

  • 5/12

    अ‍ॅपल आयफोन १३ प्रो (Apple iPhone 13 Pro) हा जगातील तिसरा सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन आहे. हे अ‍ॅपल आयफोन १३ प्रो आणि प्रो मॅक्स पेक्षा स्क्रीन आकाराच्या बाबतीत थोडे वेगळे आहे आणि लहान आहे. हे अशा लोकांसाठी आकर्षक आहे ज्यांना लहान आकारात शक्तिशाली अ‍ॅपल फोन घ्यायचा आहे.

  • 6/12

    काउंटरपॉइंट रिपोर्टनुसार, आयफोन १२ जगातील चौथा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन बनला आहे. या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री जपान आणि भारतात झाली आहे. हा एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन बनवत आहे. अलीकडेच अ‍ॅपलने आयफोन १२ च्या किंमतीत कपात केली आहे.

  • 7/12

    सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी एस २२ अल्ट्रा ५ जी (Galaxy S22 Ultra 5G) सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे आणि त्याची थेट अ‍ॅपलच्या आयफोन १३ मॅक्सशी तुलना केली जाते.

  • 8/12

    सॅमसंग गॅलेक्सी ए १३ (Samsung Galaxy A13) स्मार्टफोन या यादीत समाविष्ट असलेला सॅमसंगचा दुसरा स्मार्टफोन आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. त्याची ५० टक्क्यांहून अधिक विक्री भारतात झाली आहे.

  • 9/12

    अॅपलचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. काउंटरपॉइंटच्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये आयफोन एसई २०२२ (iPhone SE (2022) ची सर्वाधिक विक्री जपानमधून झाली. तसेच, हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा ७वा स्मार्टफोन आहे.

  • 10/12

    सॅमसंगचा हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनला विक्रीच्या बाबतीत ८ वे स्थान मिळाले आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, हा १०० डॉलरच्या आत सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन आहे.

  • 11/12

    सॅमसंगचा हा एक शक्तिशाली मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन आहे. हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन आहे. यात सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोन्सची जवळजवळ सर्व खास वैशिष्ट्ये आहेत जी त्याला अद्वितीय बनवतात.

  • 12/12

    शाओमी (Xiaomi) च्या एकूण विक्रीपैकी रेडमी नोट ११ एलटीई (Redmi Note 11 LTE) स्मार्टफोनचा वाटा सुमारे ११ टक्के आहे. हा जगातील १०वा सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन आहे.

TOPICS
अ‍ॅपलAppleमोबाइलMobile

Web Title: 10 best selling smartphones in wrold dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.