-
सध्या सर्वत्र ऑनलाईन सेलची चर्चा सुरू आहे. ऑनलाईन सेलच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठी सूट देण्यात येत आहे. अशाच एका ऑफरची सध्या चर्चा सुरू आहे. ‘रेडमी’च्या लेटेस्ट स्मार्टफोनवर ही ऑफर देण्यात येत आहे. काय आहे ही ऑफर जाणून घ्या.
-
शिओमी प्लॅटफॉर्मवर ‘दिवाळी विथ एमआय’ हा सेल लाईव्ह आहे. या सेलमध्ये रेडमी ११ प्राइम ५जी या स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.
-
‘एमआय’च्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार रेडमी ११ प्राइम ५जी स्मार्टफोन ११,७४९ रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. सेलमध्ये या फोनच्या ४जीबी व्हेरियंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. ‘सिटीबँक’वरून विकत घेतल्यास यावर १,२५० रूपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळु शकतो.
-
या फोनमध्ये ९०Hz रिफ्रेश रेटसह ६.५८ इंचाचे फुल एचडी प्लस एलसीडी देण्यात आली आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० SoC आहे, जे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह उपलब्ध होते.
-
रेडमी ११ प्राइम ५जी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा उपलब्ध होतो. हा फोन अँड्रॉइड १२ वर आधारित आहे.
-
या फोनला तीन कलर व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. फोनमध्ये २२.५W चार्जरसह ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम – redmiindia)
५० मेगापिक्सल कॅमेरा, ५जी स्मार्टफोन आणि किंमत फक्त १२ हजार! काय आहे RedMi ची ऑफर जाणून घ्या
RedMi च्या एका लेटेस्ट ५जी स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.
Web Title: Redmi 5g smartphone at 12 thousand on mi diwali sale know complete offer pns